शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून बाहेर पडणे काळाची गरज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:27 IST

देवरी : स्त्रीला आपल्या देशात देवीचा दर्जा प्राप्त आहे. घरच्या सर्व आवश्यकता व दु:खाचे निराकरण करीत आपल्या घरासह समाज ...

देवरी : स्त्रीला आपल्या देशात देवीचा दर्जा प्राप्त आहे. घरच्या सर्व आवश्यकता व दु:खाचे निराकरण करीत आपल्या घरासह समाज व विश्वाची निर्मिती व पालन करते. महिलांना वेदना तेव्हा होतात जेव्हा त्यांच्या स्वतंत्रता, शिक्षण व राजकीय आत्मसन्मानावर प्रहार होतो. आजही महिलांकडे पुरुषप्रधान मानसिकतेमुळे डोळेझाक केली जाते. अशा पुरुषप्रधान मानसिकतेतून महिलांनी बाहेर पडणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता सीमा सहषराम कोरोटे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (दि.१३) आयोजित कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून समाजात काम करणाऱ्या महिलांच्या सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. उद्‌घाटन जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुभद्रा अगडे, कला सरोटे, कल्पना बागडे, उज्ज्वला कोचे, सीमा भोयर, समिना कुरैशी, रिना बावनथडे, चंद्रकला भोयर, अनिता पंधरे, प्रभा बहेकार, छाया मडावी, अनवंता आचले, निर्मला मडावी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना कोरोटे यांनी, आज महिला राजकारण, समाजसेवा, शिक्षण, खेळ, विज्ञान व सर्व प्रशासकीय सेवेत पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा जास्त नावलौकिक करीत आहेत. ही आम्हा सर्वासाठी सन्मान व गर्वाची बाब आहे. महिलांसाठी काही विशेष दर्जा नको. परंतु महिलांना उपभोगाची वस्तू न समजता समाजात राजकारण व शिक्षण क्षेत्रात सन्मान मिळायला पाहिजे असे मत व्यक्त केले. संचालन तारा टेंभुर्णेकर यांनी केले. आभार किरण राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला तालुका व शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

-----------------

या कोरोना योेद्धांचा केला सत्कार

कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कोरोना योध्दाच्या रुपात कार्य करणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील पूजा डोये, पुष्पा धुर्वे, आशा वर्कर रविता कोटांगले, महिला पोलीस शिपाई गीता मेंढे व रेशमा सोंजाळ, घरकाम करणाऱ्या शामकला राऊत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.