शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात जिल्ह्यातील महिलांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

कोरोनाला मात देण्यासाठी आता सर्वांचे लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने, आता राज्यात लसीकरणाची मोहीम जोमात राबविली जात आहे. जिल्ह्यातही लसीकरण सुरू असून, आपला जिल्हा १०० टक्के लसीकरण झालेला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरण चळवळच सुरू केली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीपासूनच जिल्हा अग्रस्थानी राहिला आहे. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांच्यात जनजागृती केली जात असल्याने, आता नागरिक लस घेण्यासाठी स्वत:च पुढे येत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपुरुषांच्या तुलनेत संख्या जास्त : २.३३ लाख महिलांनी घेतली लस, राज्यात जिल्हा अग्रेसर

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरुवातीपासूनच अग्रस्थानी असून, आतापर्यंत जिल्ह्यात ३५.८७ टक्के लसीकरण झाल्याची नोंद आहे. असे असतानाच मात्र, जिल्ह्यातील महिलाशक्तीने ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून देत, पुरुषांपेक्षा जास्त संख्येत लसीकरण करवून घेत आघाडी घेतली आहे. सोमवारपर्यंतच्या (दि.५) आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील २,३३,२३६ महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. कोरोनाला मात देण्यासाठी आता सर्वांचे लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने, आता राज्यात लसीकरणाची मोहीम जोमात राबविली जात आहे. जिल्ह्यातही लसीकरण सुरू असून, आपला जिल्हा १०० टक्के लसीकरण झालेला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरण चळवळच सुरू केली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीपासूनच जिल्हा अग्रस्थानी राहिला आहे. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून त्यांच्यात जनजागृती केली जात असल्याने, आता नागरिक लस घेण्यासाठी स्वत:च पुढे येत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, सोमवारपर्यंत (दि.५) जिल्ह्यात ४,६६,२०८ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्याची ३५.८७ एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात महिला शक्तीने आघाडी घेतली असून, कुटुंबाच्या रक्षणासाठी पुरुषांनीही पुढे यावे, असा संदेश दिला आहे. सोमवारपर्यंतच्या लसीकरणातून ही आकडेवारी पुढे आली आहे. यामध्ये २,३२,९७२ पुरुषांनी लस घेतली असतानाच, २,३३,२३६ महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याची नोंद आहे. 

राज्यातही गोंदिया जिल्ह्यातील महिलांचाच डंका - देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून गोंदिया जिल्हा जोमात कामाला लागला असून, अधिकाधिक लसीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. याचे फलित असे की, जिल्ह्यात आतापर्यंत ४,६६,२०८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यातही २,३३,२३६ महिलांनी लस घेऊन महिलांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या राज्यातच महिलांची आघाडी असलेला गोंदिया जिल्हा एकमेव ठरला आहे. म्हणजेच राज्यातही गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी आपला डंका वाजविला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या