शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महिला देणार शेळीपालनाचे धडे

By admin | Updated: June 1, 2016 02:20 IST

महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेळीपालन प्रकल्पाला वर्षभराचा कालावधी पूर्ण होत आहे.

सालेकसा तालुक्यातील महिलांना लाभ : इतर जिल्ह्यातील महिलांनाही प्रशिक्षणगोंदिया : महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेळीपालन प्रकल्पाला वर्षभराचा कालावधी पूर्ण होत आहे. यात सालेकसा तालुक्यातील ३८ गावांमधील सहा हजार महिला यशस्विपणे शेळी पालन करीत आहेत. त्यामुळे नक्षल प्रभावित सालेकसा तालुका आता राज्यातील २५ जिल्ह्यातील महिलांना शेळी पालनाचा मार्ग दाखवेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सदर प्रकल्प तिरोडा तालुक्यातील ३० गावांमध्येसुद्धा यशस्विरीत्या सुरू आहे. या प्रकल्पात महिलांना शेळी पालनापासून त्यांची देखरेख, औषधोपचार, खरेदी-विक्रीचे तंत्र आदींचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच शेळी पालनासाठी त्यांना बँकेमधून कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. नुकतेच गोंदियामध्ये राज्यातील नागपूर, पुणे, धुळे, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, गडचिरोली, ठाणे, वाशिम, लातूर, जळगाव, हिंगोली, अकोला, भंडारा, नांदेड, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, अहमदनगर, बुलढाणा, नाशिक, नंदूरबार, बिड या जिल्ह्यातील प्रतिनिधींना सालेकसा पॅटर्नची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना कोलगड, ब्राह्मणटोला, सोनपुरी, पांढरी, गल्लाटोला, मारजीटोला, पिपरटोला, मरकदा गावांतील महिलांसह मुलाखतसुद्धा करवून देण्यात आली. लखनौ येथील गोट ट्रस्टच्या प्रतिनिधींनी गोंदियात एकत्रित २५ जिल्ह्यातील प्रतिनिधींना प्रशिक्षित केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या या योजनेतून सालेकसा तालुक्यातील जवळपास सहा हजार महिला लाभान्वित होत आहेत. या योजनेची विशेषता म्हणजे ग्रामीण महिलांसाठीच त्यांच्या सबलीकरणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावात एक पशु सखी नियुक्त केली जात आहे जी गावातील सर्व शेळ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवते. त्यामुळे शेळ्यांना होणाऱ्या आजाराची माहिती मिळते. सालेकसा तालुक्यातील महिला या योजनेमुळे आनंदित आहेत. (प्रतिनिधी)