शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

घर कोसळून एक महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:54 IST

नवेगावबांध : झोपडीवजा जीर्ण झालेले घर कोसळून त्याखाली दबून महिला जखमी झाली. येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्री १.३० वाजता ...

नवेगावबांध : झोपडीवजा जीर्ण झालेले घर कोसळून त्याखाली दबून महिला जखमी झाली. येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, मागील तीन वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुंभरे कुटुंबीयांना घरकुल न मिळाल्याने ही योजना कितपत यशस्वी ठरत आहे हे यातून दिसून आले.

येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांनी एकच आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले व त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. यात वच्‍छलाबाईंची सून उर्मिला हिच्या डोळ्याला, हाताला व पायाला इजा झाली आहे. त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कुंभरे कुटुंबीय मागील तीन वर्षांपासून घरकुलच्या प्रतीक्षेत असून, यामुळेच ते तुटक्या-फुटक्या झोपडीवजा घरात वास्तव्य करीत आहेत. असे कितीतरी कुटुंबीय आजही अशाच घरांमध्ये आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाचा धोका आहेच. आम्ही अडाणी असल्यामुळे कागदपत्रांचा पाठपुरावा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला तीन वर्षांपासून अजूनही घरकुल मिळाले नाही, अशी खंत वच्‍छलाबाई यांनी व्यक्त केली आहे. तर प्रभाग क्रमांक-६ मधील नागरिकांनी अत्यंत गरजू लोकांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने १०० अत्यंत गरज असलेल्या लोकांची यादी पाठविली आहे. पूर्वी संगणीकृत झालेल्या (अ) यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळणार. त्यानंतर ब, क, ड यादीतील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळतील अशी प्रशासकीय व्यवस्था आहे. अत्यंत गरजूंना ताबडतोब घरकुल देता येत नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते. कुंभरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत तातडीने करेल असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सांगितले आहे.

------------------------

देव तारी त्याला कोण मारी

कुंभरे यांचे घर पडल्याने त्याखाली घरातील सर्वच सदस्य दबले गेले होते. यात उर्मिला यांना मारही लागला आहे. मात्र, या ढिगाऱ्यात दबलेली साडेतीन महिन्यांची पूर्वी व अडीच वर्षांची तृप्ती या वच्‍छलाबाईंच्या दोन्ही नातींना काहीच झाले नाही व त्या सुखरूप बाहेर निघाल्या. नशीब बलवत्तर म्हणूनच या दुर्घटनेतून त्या सुखरूप बचावल्या असून, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.