शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीखाली दबून महिला ठार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

सुकडी-डाकराम : सकाळी बरसलेल्या दमदार पावसामुळे पडलेल्या घराच्या भिंतीखाली दबून महिला ठार झाली. खडकी-डोंगरगाव येथे गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० ...

सुकडी-डाकराम : सकाळी बरसलेल्या दमदार पावसामुळे पडलेल्या घराच्या भिंतीखाली दबून महिला ठार झाली. खडकी-डोंगरगाव येथे गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० दरम्यान ही घटना घडली. मृत महिलेचे नाव धनवंता रवींद्र भलावी (३९) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० दरम्यान रवींद्र भलावी, धनवंता भलावी व मुलगी घरी होते. धनवंता दुसऱ्यांच्या मजुरीवर जाण्यासाठी स्वयंपाक करीत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली व त्यांच्या अंगावर घराची भिंत कोसळली. रवींद्र यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना बोलविले असता गावकऱ्यांनी टिकास, सब्बलच्या मदतीने भिंत फोडून धनवंत यांना बाहेर काढले व येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांना तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर धनवंता यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनेची माहिती तलाठी राऊत तसेच तिरोडा पोलिसांना देण्यात आली. तलाठी राऊत यांनी मोका पंचनामा करून तहसीलदारांकडे सोपविला. धनवंता यांच्या परिवाराला शासनाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

-----------------------------

अन्यथा रवींद्रही आले असते तावडीत

सकाळी कारले कापत बसलेल्या धनवंता यांच्या जवळच रवींद्र बसले होते. मात्र धनवंता यांनी रवींद्रला डाळीचा गंज आणण्यास सांगितल्याने ते गंज आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले. तेवढ्यातच भिंत पडली व धनवंतासाठी काळ ठरली. जर रवींद्र गंज आणण्यासाठी उठून गेले नसते तर तेही भिंतीखाली दबले असते. तसेच त्यांच्या दोन मुली मामाच्या गावी गेल्या असून एक मुलगी घरात होती.