शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

भूमीपुत्र खासदार शेतकऱ्यांच्या मदतीला धावतील काय?

By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST

तलावाचा जिल्हा पावसाअभावी दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांबरोबर हजारो तलाव पाण्याने भरले आहेत. पण इंद्रदेवाने सध्या पाठ फिरविलेली आहे.

पांढरी : तलावाचा जिल्हा पावसाअभावी दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांबरोबर हजारो तलाव पाण्याने भरले आहेत. पण इंद्रदेवाने सध्या पाठ फिरविलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्धी पेरणी आटोपली असून उर्वरीत पेरणी पाण्यामुळे अपुरी आहे. या परिसरामध्ये चुलबंद जलाशय ८० ते ९० टक्के भरले आहे. परंतु त्याचे पाणी अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. त्यासाठी येथील शेतकरी वारंवार अर्ज करीत आहेत. मागील वर्षी या कालावधीमध्ये रोवण्या सुरू झाला होता. परंतु यावर्षी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. तलावाचा जिल्हा म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. सिंचनाची भक्कम सोय या जिल्ह्यात असल्याचा उदोउदो लोकप्रतिनिधी करतात. प्रत्यक्षात मात्र शेताऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहे. जिल्ह्यात शेकडो तलाव व जलाशय असली तरी आजही हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचीत आहे. जिल्ह्यात इटियाडोह, शिरपूर, पुजारीटोला, कालीसरार, चुलबंद इत्यादी सरोवरातून सिंचनाची सोय केली जाते. पावसाळयात नव्हे तर या प्रकल्पांच्या भरवश्यावर उन्हाळ्यात देखील शेतकरी धान उत्पादन घेतात. परंतु यावर्षी पावसाने दोन ते तिन दिवस भरघोष पाऊस देऊन दांडी मारली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी धानाची पेंडी विधानभवनात नेवून आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोले यांनी स्वत:ची ओळख भूमिपूत्र म्हणून गोंदिया, भंडारा जिल्ह्यात निर्माण केली आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठमोठे आंदोलन उभारून विरोधकांना हादरून सोडणारे भूमिपुत्र पटोले आज घडीला सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. परिणामी शेतकऱ्याचे कैवारी नेते मदतीला धावतील काय? अशी आर्त हाक शेतकरी देऊ लागले आहेत. (वार्ताहर)