शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार स्पष्ट गावचा प्रमुख कारभारी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. त्यानंतर २८ जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आता ...

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. त्यानंतर २८ जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आता आरक्षणानुसार सरपंच व उपसरपंचपदी सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि.१२) पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या गावचा प्रमुख कारभारी कोण, याचे चित्र शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडप्रक्रियेला घेऊन फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या आणि येथूनच पुढे जि. प. अध्यक्ष, आमदार, खासदार आणि मंत्री पदापर्यंत मजल मारली जाते. ग्रामपंचायतच्या राजकारणातून अनेक नेते घडल्याची उदाहरणेसुध्दा जिल्ह्यात आहेत. तसेच ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायतची निवडणूक महत्त्वपूृर्ण समजली जाते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे गांभीर्याने बघतात. जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. मात्र, यंदा राज्य निवडणूक आयोगाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर केले. त्यामुळे सदस्य निवडून आले तरी सरपंचपदी कोण आरुढ होणार हे स्पष्ट झाले नव्हते. त्यानंतर २८ जानेवारीला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता शुक्रवारी (दि. १२) सरपंच आणि उपसरपंचाची निवडप्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतनिहाय निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्ह्यातील १७५ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच निवडण्याची प्रक्रिया निवडून आलेले सदस्य पार पाडणार आहेत. त्यामुळे या निवडप्रक्रियेला घेवून गावकऱ्यांतसुध्दा प्रचंड उत्साह आहे.

.......

पर्यटनाला गेलेले सदस्य परतणार आज

सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडीदरम्यान फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये फूट पडू नये यासाठी निवडून आलेल्या सर्व पॅनलच्या सदस्यांनी खबरदारी घेतली आहे. यासाठी सरपंचपदाची निवडणूक जाहीर होईपर्यंत आपल्या सदस्यांना बाहेरगावी पर्यटनाला पाठविले होते. आता हे सर्व सदस्य शुक्रवारी आपल्या गावी परतणार आहेत.

......

सत्ता कोणाची होणार स्पष्ट

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर आपले सदस्य निवडून आल्याचा दावा केला होता. तसेच निवडून आल्यानंतर जो-तो आपलाच म्हणत सुटला होता. मात्र, आता शुक्रवारी सरपंचपदाची निवड केली जाणार असून कोणत्या पक्षाचा सदस्य ग्रामपंचायमध्ये विराजमान होतो यानंतरच त्या ग्रामपंचायतवर कोणत्या पक्षाची सत्ता हे देखील स्पष्ट होणार आहे.

.......

सर्व राजकीय पक्षांचे लक्ष

जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतीवर आपल्या पक्षाची सत्ता स्थापन व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता सरपंच निवडीदरम्यान या सर्वांचा कस लागणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मागील तीन चार दिवसांपासून यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

.......