शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आगीला जबाबदार कोण?

By admin | Updated: December 25, 2016 02:01 IST

गोंदिया शहराच्या मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या मार्केट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हॉटेल बिंदल प्लाझात

अजूनही थांगपत्ता नाही ८५ तास लोटले : सात मृतांचे आत्मे मागताहेत न्याय मनोज ताजने/नरेश रहिले  गोंदिया गोंदिया शहराच्या मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या मार्केट परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हॉटेल बिंदल प्लाझात अनेक नियमांची पूर्तता झालेली नसल्याचे नगर परिषदेचे अधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र घटनेला ८५ तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी या गंभीर घटनेसाठी कोण जबाबदार आहेत यांचा थांगपत्ता तपास यंत्रणेला लागला नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. हॉटेल बिंदलमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्यामुळे वाहनधारकांची अडचण होत होती. यातूनच अनेक वाहने रस्त्यावर लावली जात होती. तरीही कधी त्या वाहनांवर कारवाई झाली नाही. याच हॉटेलच्या पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर असलेला झी महासेल गेल्या अनेक वर्षांपासून तिथे स्थायी दुकान थाटून बसला होता. त्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. पोलिसांनी नगर परिषदेच्या नगर रचना विभाग व अग्नीशमन विभागाला जबाब देण्याचे पत्र दिले आहे, या पोलिसांच्या पत्रामुळे नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी गोंधळात पडले असून आपल्या चुकीवर पांघरुन घालण्यासाठी कर्मचारी आता पळवाटा शोधत आहेत. पालकमंत्र्यांची दिलेल्या फायर आॅडिट करण्याच्या सूचनेचे पालन होणार का, हाही प्रश्न आहे. काय झाले फायर आॅडिटच्या पत्राचे? गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाने हॉटेल बिंदल प्लाझाच्या संचालकाला ३ आॅगस्ट २०१३ रोजी फायर आॅडिट करण्याचे पत्र दिले होते. एक महिन्याच्या आत फायर आॅडिट न केल्यास आपल्याविरुद्ध महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ कलम ५, ६, ७ व ८ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे ठणकावले होते. परंतु या कलमांच्या आधारे काय शिक्षा, काय दंडाची तरतूद आहे या संदर्भात विभाग प्रमुख प्रकाश कापसे यांना विचारणा केल्यावर यासंबंधीच्या कायद्याची माहिती आपल्याकडे नसून आपण आता पुस्तक मागवित असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षानुवर्षे त्याच पत्रांची पुनरावृत्ती करुन पत्र देऊन मोकळे होणे हेच आपले कर्तव्य असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईवरून दिसून येते. विद्युत विभागामुळे होऊ शकते पुनरावृत्ती गोंदिया शहराच्या मार्केट परिसरात आधीच अत्यंत अरूंद रस्ते आहेत. त्यात व्यापारी वर्गाने अतिक्रमण केले आहे. त्यातच मार्केट परिसरातील प्रत्येक विद्युत थांबांवर मोठ्या प्रमाणात तारांचे जाळे गुंतलेले आहे. या तारांमधून अनेक वेळा स्पार्र्किंगही होत असते. तरीही त्याबाबत वीज वितरण विभाग गंभीर नाही. अंडरग्राऊंड केबल टाकण्याची योजना वर्षभरापासून मंजूर असूनही निविदेच्या नावावर निव्वळ कागदी घोडे नाचविले जात आहेत. ही बाब गांभिर्याने घेतली नाही तर बिंदलमधील आगीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.