शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST

गोंदिया : कुणाचा वाढदिवस असो की शहरात आगमन.. पक्षप्रवेश असो की सणवार असे कोणतेही कारण असल्यास शहरातील चौकाचौकांत होर्डिंग्ज ...

गोंदिया : कुणाचा वाढदिवस असो की शहरात आगमन.. पक्षप्रवेश असो की सणवार असे कोणतेही कारण असल्यास शहरातील चौकाचौकांत होर्डिंग्ज झळकतात अशी स्थिती शहराची झाली आहे. यामध्ये अनधिकृत ठिकाणीही होर्डिंग लावले जात असल्याने शहर विद्रुप होत आहे. पूर्वी होर्डिंगबाजीचे हे प्रमाण खूप जास्त होते व त्यातही मिळेल जागा तेथे होर्डिंग लावून संबंधित मोकळे होत होते. शिवाय वाटेल तेवढे दिवस त्यांचे होर्डिंग लागून राहत होते. यात मात्र नगर परिषदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र आता नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, शहरात लागणाऱ्या होर्डिंगची पावती फाडून ठरावीक कालावधीसाठीच ते लावण्याची परवानगी दिली जात आहे. यामुळे होर्डिंगबाजी नियंत्रणात आली असून, नगर परिषदेच्या तिजोरीतही थोडीफार भर पडत आहे.

------------------------------------

१) 3 कॉलम फोटो ( शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा फोटो)

--------------------------------

या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?

- आपले होर्डिंग लोकांच्या नजरेत यावे यासाठी शहरातील जयस्तंभ चौक हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

- त्यानंतर असे दुसरे ठिकाण म्हणजे नेहरू चौक असून, येथे सर्वाधिक होर्डिंग्ज लावले जातात.

- तसेच शासकीय विश्रामगृह परिसराची जागा मोक्याची जागा असल्याने तेथेही होर्डिंग्जसाठी जास्त मागणी असते.

------------------------------

आता सातत्याने होतात कारवाया

१: पूर्वी नगर परिषदेचे होर्डिंगबाजीकडे लक्ष नव्हते व त्यामुळे कुणीही कोठेही आपल्या मर्जीने कितीही दिवस होर्डिंग लावून घेत होते.

२) या सर्व प्रकारांवर आता नगर परिषद गंभीर झाली असून, परवाना विभागाला याची जबाबदारी देण्यात आली आहे.

३) विभागाकडून आता सातत्याने कारवाया होत असून, त्यातून नगर परिषदेला उत्पन्नही मिळत आहे.

-------------------------------

होर्डिंग्ज जप्त व दंडाची पावती

- नगर परिषदेकडून कारवाया होत असल्याने आता फुकटात होर्डिंग्ज लावणाऱ्यांची संख्या नाहीच दिसून येत असून, पैसे भरून तेवढ्या दिवसांसाठीच होर्डिंग लावले जात आहे.

- मात्र एखाद्याने पैसे न भरता होर्डिंग लावल्यास सर्वप्रथम नगर परिषद पथकाकडून त्याचा होर्डिंग उतरवून जप्त केला जातो.

- तसेच संंबंधिताने लावलेला होर्डिंग किती दिवसांपासून लागून होता हे बघता तेवढ्या कालावधीसाठी त्याची पावती फाडून तेवढी रक्कम वसूल केली जाते.

------------------------------------

संबंधित विभागाची नजर ...

शहरात अवैधरीत्या होर्डिंग लावण्याचे प्रकार आता कमी झाले आहे. कारण, या कामावर नजर ठेवण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्या विभागाची नजर राहत असून, लगेच कारवाई केली जाते. विभागाकडून सातत्याने कारवाया सुरू असून, त्यांची नजर असते.

- करण चव्हाण

मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया