शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीची परीक्षा द्यायची की रेल्वेची विद्यार्थ्यांसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 05:00 IST

राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने एमपीएससी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला. दरम्यान, यावरुन गोंधळ उडून राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर राज्य सरकारने २१ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा घेण्याचे जाहीर केले. मात्र रेल्वे विभागाने परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली होती. त्यामुळे आता या दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देएकाचदिवशी दोन्ही परीक्षा : विद्यार्थी गोंधळात : अभ्यासानुसार देणार प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलत ती २१ मार्च रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचदिवशी रेल्वेचीसुध्दा परीक्षा आधीच निश्चित करण्यात आली होती. त्यातच आता या दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने परीक्षेला बसणारे विद्यार्थी गोंधळात पडले असून, अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या परीक्षेला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तर काही विद्यार्थ्यांनी अभ्यासानुसार कोणती परीक्षा द्यायची, याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने एमपीएससी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला. दरम्यान, यावरुन गोंधळ उडून राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर राज्य सरकारने २१ मार्च रोजी एमपीएससीची परीक्षा घेण्याचे जाहीर केले. मात्र रेल्वे विभागाने परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली होती. त्यामुळे आता या दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना एका परीक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांनी एमपीएससीच्या प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. 

रेल्वेची परीक्षा होणार ऑनलाईन कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने मागील चार पाच वर्षांपासून रेल्वेची परीक्षा ऑनलाईन घेण्यास सुरुवात केली आहे. ३२ हजार २०८ जांगासाठी २१ मार्च रोजी परीक्षा होणार असून, यासाठी जिल्ह्यातील अडीच हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होेते. 

विद्यार्थ्यांची होणार कसरत रेल्वे परीक्षेचे केंद्र नागपूर, रायपूर, हैदराबाद या ठिकाणी आहे. मात्र नागपूर येथे लॉकडाऊन असल्याने येथे परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर परीक्षा केंद्रावर वेळीच पोहोचण्यासाठी धावपळ होईल.

दोन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतात....रेल्वे आणि एमपीएससीची परीक्षा २१ मार्चला होणार आहे. मी दोन्ही परीक्षेसाठी अर्ज भरले होेते. पण एमपीएससीच्या परीक्षेसाठी मी आधीपासूनच तयार केली होती. म्हणून मी रेल्वेऐवजी एमपीएससीची परीक्षा देणार आहे. - आदित्य लुलू, परीक्षार्थीराज्य शासनाने एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात वेळोवेळी बदल केला. यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थीसुध्दा गोंधळात पडले. रेल्वे विभागाची परीक्षासुध्दा नेमकी त्याचदिवशी येणार, अशी कल्पना नव्हती. मात्र आता अभ्यासानुसार निर्णय घेणार आहे. - नितीन वाळके, परीक्षार्थीरेल्वे विभागाची परीक्षा बऱ्याच दिवसांनी होत आहे. तसेच या परीक्षेसाठी मी सुरुवातीपासून तयारी केली आहे. त्यामुळे मी रेल्वेची परीक्षा देणार आहे. मात्र राज्य सरकारने केलेल्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. - विराज पटले, परीक्षार्थी.

 

टॅग्स :examपरीक्षा