शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठा बरोबर असताना युरिया मुरतोय कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:33 IST

गोंदिया : सध्या खरीप हंगाम सुरू असून, रोवणीची कामे जवळपास पूर्णपणे आटोपली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना युरियाची गरज आहे. ...

गोंदिया : सध्या खरीप हंगाम सुरू असून, रोवणीची कामे जवळपास पूर्णपणे आटोपली आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना युरियाची गरज आहे. मात्र बाजारपेठेत युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची त्यासाठी भटकंती सुरू आहे. काही विक्रेत्यांकडे युरिया असून, ते यासोबत युरिया खत घेण्यासाठी ११०० रुपयांची संयुक्त खते घेण्याची सक्ती करीत आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार, मागणीच्या तुलनेत पुरवठा बरोबर आहे. मग युरिया नेमका मुरतोय कुठे? हे कळण्यास मार्ग नाही.

यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. याच दृष्टीने कृषी विभागाने खताचे नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एकूण २१ हजार ८९० टन खताची मागणी केली आहे. यापैकी १८ ऑगस्टपर्यंत १२ हजार ८५० मेट्रिक टन युरिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. महिन्यानुसार खताचे मंजूर केलेले नियतन आणि केलेला पुरवठा बरोबर आहे. मात्र यानंतरही संपूर्ण जिल्ह्याभरातच युरिया खत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. मागणी व पुरवठा बरोबर असताना युरिया नेमका जातो कुठे हे कळायला मार्ग नाही. युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून अतिरिक्त दराने त्याची विक्री केली जात असल्याची शंका बळावली आहे. तर काही विक्रेते युरिया देण्यासाठी संयुक्त खते घेण्याची सक्ती शेतकऱ्यांवर करीत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पण, या सर्व प्रकाराकडे कृषी विभाग डोळे मिटून पाहत आहे.

.....

१३ कृषी केंद्रांना बजावली नोटीस

कृषी केंद्र संचालकांना खताची विक्री करताना ई पास मशीनवर नोंद घेऊन शेतकऱ्यांचे अंगठे त्यावर लावणे अनिवार्य आहे. ई-पास मशीनमधील स्टाॅक आणि स्टॉक बुकवरील स्टॉकची नोंद बरोबर असणे आवश्यक आहे. मात्र १३ कृषी केंद्रांमध्ये या नोंदी बरोबर न आढळल्याने या कृषी केंद्रांना कृषी विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

.......

बफर स्टॉकमधील युरियाचे वितरण

खताची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी खताचा काही बफर स्टॉक करून ठेवला जातो. टंचाईच्या कालावधीत या खताचा वापर केला जातो. आतापर्यंत १९८० मेट्रिक टन युरिया खताच्या बफर स्टॉकचा वापर करण्यात आला आहे.

.....

महिन्यानुसार युरिया खताचा झालेला पुरवठा

एप्रिल : २०,६२४

मे : ३,०६५

जून : ४,८११

जुलै : ४,५९३

ऑगस्ट : ४,०५५

...................