शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

असा सुरु झालाय ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

पूर्वी मतपत्रिकेच्या सहायाने मतदान होत असे, मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि पारदर्शकतेचे प्रश्न यामुळे बऱ्याचदा अडचणीची परिस्थिती निर्माण होत असे. या प्रक्रि येत सुलभता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम सन १९७७ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त एस.एल. शेकदार यांनी ईलेक्ट्रॉनिक यंत्राची कल्पना मांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनविषयी मतदार नेहमी चर्चा करतात. यंत्राविषयी खास आकर्षणही असते. निवडणुकीत पारदर्शकतेसाठी या यंत्राची भूमिका महत्वाची आहे. लोकसभा निवडणूक २०१९ पासून सर्व मतदारसंघात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रदेखील उपयोगात आणण्यात आले आहे. ईव्हीएम ते व्हीव्हीपॅट या प्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.पूर्वी मतपत्रिकेच्या सहायाने मतदान होत असे, मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि पारदर्शकतेचे प्रश्न यामुळे बऱ्याचदा अडचणीची परिस्थिती निर्माण होत असे. या प्रक्रि येत सुलभता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम सन १९७७ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त एस.एल. शेकदार यांनी ईलेक्ट्रॉनिक यंत्राची कल्पना मांडली. सन १९७९ मध्ये सर्वप्रथम प्रोटो-टाईम ईव्हीएम तयार करण्यात आले. सन १९८०-८१ मध्ये ईलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन आॅफ इंडिया आणि भारत ईलेक्ट्रॉनिक लिमिटेड या संस्थांनी हे यंत्र तयार करु न त्यांचे सादरीकरण केले. भारत निवडणूक आयोगाने ६ आॅगस्ट १९८० मध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर या यंत्राचे सादरीकरण केले. जानेवारी १९८१ मध्ये बंगालमध्ये बेल ने निवडणूक आयोगासमोर ही यंत्रे बनविण्याचा प्रस्ताव ठेवला. २९ जुलै १९८१ मध्ये निवडणूक आयोगाने बेल ईसीआयएल, विधी व न्याय मंत्रालय आणि काही राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ईव्हीएमच्या वापराबाबत चर्चा केली. त्यांनतर प्रायोगिक तत्वावर ही यंत्रे वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला.१९ मे १९८२ मध्ये केरळ राज्यातील परु र विधानसभा क्षेत्रात ५० मतदान केंद्रांवर ईव्हीएमचा प्रथम वापर करण्यात आला. सन १९८२-८३ मध्ये राज्य आणि एक केंद्रशासीत प्रदेशातील ११ विधानसभा मतदारसंघांत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले.सन १९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधीत्व कायद्यात सुधारणा करेपर्यंत ईव्हीएम वापरण्याबर मनाई करण्याचा निर्णय दिल्याने या यंत्राचा वापर स्थगीत करण्यात आला. सन १९८८ मध्ये कायद्यात दुरु स्ती झाल्यानंतर १५ मार्च १९८९ पासून ईव्हीएमचा वापर सुरु करण्यात आला. जानेवारी १९९९ मध्ये नेमलेल्या तज्ज्ञ समितीने एप्रिल महिन्यात सादर केलेल्या अहवालात एकमताने ईव्हीएम वापरण्याची शिफारस केली. सन २००० नंतर झालेल्या तीन लोकसभा आणि ११८ विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले.आतापर्यंत २५० कोटी मतदारांनी समाधानकारकरित्या ईव्हीएमद्वारे मतदान केले आहे. सन २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेच्या आधारे मतदान घेण्याबाबतची याचिका खारीज केल्याने यावर्षीच्या लोकसभा निवडणुकांमधील मतदान देखील ईव्हीएमव्दारे करण्यात आले आहेत.मे २०१७ पासून सर्व निवडणुकांमध्ये आणि लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देशात सर्वत्र व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. १४ आॅगस्ट १९९३ रोजी द कंडक्ट ऑफ रु रल १९६१ मध्ये सुधारणा करु न व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ सप्टेंबर २०१३ रोजी नागालॅँडमधील ५१ नोकसेन विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग करण्यात आला.