शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी सहायता निधी गेला कुठे?

By admin | Updated: July 29, 2014 23:54 IST

सडक/अर्जुनी तालुक्यासाठी शासनाने पाठविलेला अतिवृष्टी सहायता निधी गेला कुढे? असा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकरी करीत आहेत. महिने लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही.

शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यासाठी शासनाने पाठविलेला अतिवृष्टी सहायता निधी गेला कुढे? असा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकरी करीत आहेत. महिने लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही. याची विचारपूस करण्याकरिता तहसील कार्यालयाच्या संबंधीत बाबूकडे गेले असता मी नव्यानेच चार्ज घेतला आहे. गठ्यात असेल असे टालमटोल उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात येतात. यावरून देवरीची पुनरावृत्ती तर झाली नसावी अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागली आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकरी होरपळून निघाला. जखमेवर ईलाज म्हणून शासनाने नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्याच्या आठही तालुक्याला वळती केली. तलाठ्याकरवी प्रत्येक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक मागविण्यात आले. तलाठ्यांनी इमाने इतबारे खाते क्रमांक व आराजीची यादी तहसील कार्यालयास सादर केली. परंतु अनेक कास्तकारांची नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात आजपावेतो जमाच झाली नाही. सदर प्रतिनिधीने वरिल घटनेची माहिती घेण्याकरिता संबंधीत लिपीकाशी संपर्क साधला असता. शेतकऱ्यांनी खाते क्रमांक व बँकेचे नावबरोबर दिले नाही. सध्या गठ्ठा मोठा आहे. बँकेकडून लिस्ट आली आहे. जेवढे शेतकरी सहायता निधीपासून सुटले आहेत ते बघावे लागणार असे उत्तर देऊन मोकळे झाले. आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळेल व त्या रकमेचा उपयोग पावसाळी हंगामाला होईल या आशेने शेतकरी तयारीत असतानाच प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्याचे बेहाल होत आहेत. तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाईची रक्कम त्यांचा बँक खात्यात वळती करावी अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)