शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यत्व गेल्याने सरपंच पायउतार

By admin | Updated: December 25, 2016 02:11 IST

निवडणूक आटोपल्यानंतर चार महिन्यांच्या आत जाती वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे नियम

जाती वैधता प्रमाणपत्र भोवले : अपर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश गोंदिया : निवडणूक आटोपल्यानंतर चार महिन्यांच्या आत जाती वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे नियम असतानाही प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत सदस्यत्वास अपात्र ठरल्याने महिलेला सरपंच पदावरूनही पायउतार व्हावे लागले. तालुक्यातील ग्राम रजेगाव येथील हे प्रकरण असून जाती वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचा फटका सरपंच केशरबाई उपवंशी यांना बसला आहे. सविस्तर असे की, केशरबाई उपवंशी सन २०१२ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यानंतर त्या सरपंच पदावर निवडून आल्या. त्या वॉर्ड क्रमांक ३ मधून इतर मागासवर्गा करिता राखीव पदावरून निवडून आल्या. मात्र त्यांनी जात वैधता प्रमाणपज्ञ विहीत कालावधीत सादर केले नाही. तसेच जाती वैधता पडताळणी समितीकडेही प्रलंबीत नाही. यावरून त्यांना नियमांचा व मुंबई व ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींचा काही मान नाही. त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदींचे पालन न केल्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत राहण्यास अपात्र ठरत असून अधिनियमातील तरतुदींनुसार त्यांना अपात्र करावे असा अर्ज रविंद्र ठाकरे यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. प्रकरणी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, तसेच अधिनियम व शासन निर्णय बघता निवडून आल्याच्या सहा महिन्यांच्या आत जाती वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधीत सदस्याची निवड रद्दबाबतल झाली असे समजले जाईल अशी तरतूद आहे. त्यानुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतूद, ग्रामविकास विभागाचे पत्र, शासन निर्णयातील तरतूद व अन्य बाबींना लक्षात घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी केशरबाई उपवंशी यांना सदस्य पदावर कार्यरत राहण्यास अपात्र ठरविले. (शहर प्रतिनिधी)