शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सहाही आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 00:29 IST

गोरेलाल चौकातील हॉटेल बिंदलमध्ये गेल्या २१ डिसेंबरच्या पहाटे लागलेल्या आगीत सात जण अडकून

घटनेला ११ दिवस : न.प.चा अहवाल गुलदस्त्यात गोंदिया : गोरेलाल चौकातील हॉटेल बिंदलमध्ये गेल्या २१ डिसेंबरच्या पहाटे लागलेल्या आगीत सात जण अडकून मरण पावले. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक घटना समोर आल्या. मात्र अद्याप नगर परिषदेचा अहवाल आला नाही. त्यांची याबाबत दोनदा न.प. मुख्याधिकाऱ्यांची भेटही घेतली. मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत टाळले जात आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले सहाही आरोपी फरार आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात हॉटेल बिंदलच्या मालकाने अनेक प्रकारच्या परवानग्या घेतल्या नसल्याचे उघड झाले. खोल्यांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्थासुद्धा केलेली नव्हती. एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था नव्हती. आणीबाणीच्या प्रसंगासाठी इमरजंसी एक्झीस्ट ठेवलेले नव्हते. फायर अलार्म सिस्टमसुद्धा लावली नव्हती. तपास अधिकारी बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे नेमके कारण काही सांगता येत नसल्याचे विद्युत विभागाच्या अहवालात नमूद आहे. तर तहसील कार्यालयाच्या अहवालात सन २०१४ पासून रिन्यूअल नसल्याचे म्हटले आहे. तर फायर विभागानुसार आॅडिट रिपोर्ट नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र इमारतीबाबत नगर परिषदेचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची दोनदा भेट घेतली. मात्र निवडणूक कामात व्यस्त असल्याचे सांगत अहवाल पुढे ढकलले जात आहे. आरोपींना अटक करण्यात आली नसून कोणत्याही कलमांमध्ये वाढही करण्यात आलेली नाही. सर्व आरोपी फरार आहेत. (प्रतिनिधी) ‘त्या’ सिलिंडरचे रहस्य गुलदस्त्यात ४बिंदल हॉटेलमध्ये आग लागून सात जणांचा मृत्यू झाला. या हॉटेलमध्ये केवळ दोन सिलिंडरचा परवाना होता. मात्र प्रत्यक्ष तपासात एकूण २२ सिलिंडर आढळले. त्यामुळे अवैधपणे तिथे असलेले २० सिलिंडर कुठून आले? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत अद्याप गुन्हासुद्धा नोंद करण्यात आलेला नाही. प्रत्येक सिलिंडरवर क्रमांकही असतो. सिलिंडरच्या चौकशीत एचपी व इन्डेन गॅस एजंसीचे संचालकसुद्धा अडकण्याची दाट शक्यता आहे.