शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातर्फे वृक्षदिंडीचे स्वागत

By admin | Updated: June 26, 2017 00:24 IST

ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन नागपूरच्यावतीने विधान परिषदेचे आ. अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली

४ कोटी वृक्ष लागवड : अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७३ हजार वृक्ष लागवड लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन नागपूरच्यावतीने विधान परिषदेचे आ. अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनजागरण वृक्षदिंडीचे स्वागत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले. १ ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्षारोपण करण्याची मोहीम राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण अभियानाच्या संकल्प पूर्तीसाठी नागपूर येथील ग्रीन अर्थ आॅर्गनाईझेसनतर्फे आ. अनिल सोले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांमध्ये वृक्ष प्रेमासाठी, जनजागरण करण्याच्या हेतूने वृक्षदिंडी काढण्यात आली आहे. अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रामध्ये वृक्षदिंडीचे आगमन होताच वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले यांनी स्वागत केले. यावेळी मार्गदर्शन करताना आ. अनिल सोले म्हणाले, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज आहे. जंगलाचे प्रमाण वाढावे, नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे, ग्रामस्थांमध्ये वृक्षाबद्दल आकर्षण वाढावे, त्यांच्यामध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी गावागावात आकर्षित असे वृक्षरथ वृक्षदिंडीच्या माध्यमातून भ्रमण केले जात आहे. मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आहे. यावर आळा घालण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. मानवी जीवनाला निसर्गाच्या सहवासातून इंधन, पाणी, शुद्ध हवामान, रोजगार निर्मिती मोफत मिळते. परंतु आपण त्याची परतफेड करू शकत नाही. वाढता प्रदुषणावर आळा सविण्यासाठी प्रत्येकानी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. ७३ हजार वृक्ष लागवड अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने ७३ हजार ८८४ वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले यांनी सांगितले. वृक्ष लागवड ही एक लोकचळवळ व्हावी यादृष्टीने ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. बुटाई भाग १ मध्ये ११ हजार ११०, बुटाई भाग २ मध्ये २५ हजार, झरपडा १६ हजार ६६५, बोदरा २ हजार २२२, मालकनपूर १८ हजार ८८७ असे ७३ हजार ८८४ वृक्ष लागवड केली जाणार आहेत. यात विविध प्रजातींचा समावेश करणार आहे. वृक्षदिंडी आगमनाप्रसंगी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.