शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

स्वच्छता पालखीचे सडक अर्जुनीत स्वागत

By admin | Updated: November 13, 2016 01:26 IST

स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी २ आॅक्टोबरपासून राज्य भ्रमंतीवर निघालेल्या संत गाडगे महाराज ...

आमदार आदर्श ग्राम कनेरी : डव्वासह १२ गावात पालखीचे भ्रमणसडक-अर्जुनी : स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी २ आॅक्टोबरपासून राज्य भ्रमंतीवर निघालेल्या संत गाडगे महाराज यांची स्वच्छता पालखी जिल्ह्यात वडसा मार्गे अर्जुनी-मोरगाव येथे ८ नोव्हेंबर रोजी दाखल झाली. सदर स्वच्छता पालखी ९ नोव्हेंबर रोजी सडक-अर्जुनी तालुक्यातील खोबा येथे दाखल झाली असता सहायक गटविकास अधिकारी टेंभरे व अर्जुनी-मोरगावचे सहायक गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून श्रीफळ देवून पालखीचे स्वागत केले.जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, विस्तार अधिकारी अनूप भावे, स्वच्छता विभागाचे सूर्यकांत रहमतकर, तालुका संपर्क अधिकारी भागचंद्र रहांगडाले, राजेश उखळकर, देवानंद बोपचे, गटसमन्वयक राधेशाम राऊत, भूमेश्वर साखरे, पौर्णिमा उईके, खोबा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते. स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून ही पालखी महाराष्ट्र भर फिरून स्वच्छता संदेश देत आहे. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीतून गावोगावी जावून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत त्या गाडीचे पालखीत रुपांतर करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात ही पालखी मार्गक्रमण करून स्वच्छतेबाबत जनजागृती करीत आहे. दरम्यान सडक-अर्जुनी तालुक्यातील खोबा येथे सर्वप्रथम पालखीचे आगमन झाल्यावर थाटात स्वागत करण्यात आले. सदर पालखीचे कोकणा/जमी., आमदार आदर्श ग्राम कनेरी/राम, चिखली, कोहमारा मार्गे वडेगाव, परसोडी, खजरी, डव्वा, पळसगाव, भुसारीटोला, पाटेकुर्रा या मार्गे गोरेगाव तालुक्यात प्रस्थान झाले. कोकणा व कनेरी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावात पालखी रथाचे भ्रमण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)