शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
3
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
4
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
5
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
6
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
7
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
8
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
9
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
10
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
11
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
12
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
13
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
14
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
15
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
16
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
17
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
18
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
19
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
20
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षवल्ली आम्हा सोयरे .....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:36 IST

रविवारची सुटी कुणाला आवडत नाही. पण ती सुटी निसर्गप्रेम जपण्यासाठी घालवायची म्हटली तर आजच्या तरु णाईच्या पोटात गोळा उठतो.पण अर्जुनी मोरगावच्या सरस्वती विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या भार्गव अजय राऊत या विद्यार्थ्याने वृक्षलागवडीचा आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांने घेतला वृक्षलागवडीचा ध्यास, तयार केली सीड बँक

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : रविवारची सुटी कुणाला आवडत नाही. पण ती सुटी निसर्गप्रेम जपण्यासाठी घालवायची म्हटली तर आजच्या तरु णाईच्या पोटात गोळा उठतो.पण अर्जुनी मोरगावच्या सरस्वती विद्यालयात आठवीत शिकणाऱ्या भार्गव अजय राऊत या विद्यार्थ्याने वृक्षलागवडीचा आदर्श निर्माण केला आहे.त्याच्या या स्तुत्य उपक्र माची प्रशंसा केली जात आहे.वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे हा संत तुकारामांचा अभंग ऐकतांना सभोवताली अरण्यच साकारल्याचा साक्षात्कार होतो.इतके सामर्थ्य या अभंगात आहे. तुकारामांचा काळ हा निसर्गाच्या सानिध्यात भरपूर वनश्रीने नटलेला ४०० वर्षांपूर्वीचा काळ होता. तरीही संत निसर्गाप्रती आपला कृतज्ञभाव व्यक्त करतात. निसर्ग व पर्यावरणाविषयी कुणीही संवेदनशील नाही. वैयिक्तक स्वार्थासाठी निसर्गाचा ऱ्हास होतांना आपण बघत आहोत. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा ओळखून वृक्षलागवडीचा ध्यास घेणे काळाची गरज आहे. रविवार सुटीचा दिवस कुठेही मित्रांसोबत रमायचे नाही व टीव्ही सुद्धा बघायचा नाही. फक्त घराच्या माडीवर जाऊन काम करायचे हा त्याचा ध्यास.आपण कोणतीही फळ खाल्यानंतर निरु पयोगी समजून त्याचे बीज फेकतो. ती निरर्थक वाया जातात. मात्र भार्गवने प्रत्येक ऋ तूत होणाºया फळांच्या बिया गोळा करून ठेवल्या, शेजाऱ्यांना गोळा करून ठेवण्यास सांगितले आणि बिया जिथे दिसतील तिथून आणल्या.उन्हाळ्यात हे बीज वाळत घातली. पावसाळ्यात बीज पेरले की ती जगतात म्हणून त्याने सिडसबॉल पद्धतीचा अवलंब केला.सीड्सबॉलच्या माध्यमातून रोपणसीड्सबॉल म्हणजे मातीचे गोळे होय.माती, शेणखत व गोमूत्रच्या मिश्रणात दोन तीन बिया टाकून सिडसबॉल तयार केले जातात.या बॉलमध्ये पोषक मूल्ये असल्यामुळे जमिनीत रु जेपर्यंत ती तग धरू शकतात. यापध्दतीने भार्गवने सुमारे एक हजार सिडसबॉल तयार केले. गोळा केलेली बिया व सिडसबॉल ही सुरिक्षत ठिकाणी नेऊन फेकायची हा त्याचा दृष्टिकोन आहे. त्याने यावर्षात पपई, सीताफळ, बोर, जांभूळ, चिकू, आंबा, मोह (टोरी) या स्थानिक झाडांच्या प्रजातीच्या बियांचा वापर केला.सुटीच्या दिवशी राबविला उपक्रमओसाड जमीन, टेकडी, गाव किंवा शहराच्या मोकळ्या परिसरात सिडसबॉल नुसते फेकले तरी त्यातून रोपटे निघते. हा उपक्र म सुटीच्या दिवशी करायचा असा निर्धार त्याने केला. तयार केलेले सिडसबॉल हे मागणी करणाऱ्या इच्छुक व्यक्तीला तो मोफत देतो. अनेकांनी हे सिडसबॉल त्याचेकडून नेले आहेत.वर्षभरात गोळा केलेले बीया व सिडसबॉल त्याने रविवारी रामघाटच्या जंगलात नेऊन टाकले.सुमारे हजार बिया व सिडसबॉल टाकली यापैकी निदान शंभर झाडे जरी तयार होऊन जगलीत तरी आपण केलेल्या परिश्रमाचे फलित होईल, असा आशावाद त्याने प्रस्तूत प्रतिनिधी जवळ व्यक्त केला.प्रेरणादायी उपक्रमबीजे अस्ताव्यस्त न फेकता त्याचे संकलन करून जंगलात नेऊन टाकली तर वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण होऊन वृक्षवल्ली आम्हा सोयरे ... या उक्तीला निश्चितच साजेसा ठरू शकतो यात तीळमात्र शंका नाही. ग्लोबलवार्मिंगसारख्या समस्येपासून वसुंधरेला वाचिवण्यासाठी खारीचा वाटा उचलणाºया भार्गवाचा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय असा आहे.रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोगदिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर चालली आहे. भौतिक सुविधेपोटी अत्याधिक होणाºया सिमेंटच्या वापरामुळे येणाऱ्या काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. त्याची चाहूल लागायला सुरु वात झाली आहे.पावसाचे पाणी वाया जाऊ नये ते विहिरीतच पडावे यासाठी भार्गवने कोणतेही खर्च नसलेला प्रयोग घरी केला आहे. त्याने छताच्या अगदी काही अंतरावर पाण्याची गाळणी लावली, त्याखाली एक प्लास्टिकचा पसरट ट्रे लावला. छताचे पाणी शुद्ध होऊन ट्रेमध्ये येते, ते पाणी एक इंच पाईपद्वारे विहिरीत येते. विहिरीत पाणी पडण्यापूर्वी विहिरीच्या तोंडाजवळ आणखी पाणी फिल्टर होण्यासाठी गाळणी बसवली आहे. यापद्धतीने रेन हार्वेस्टिंगचा सुध्दा प्रयोग भार्गवने घरी अवलंबिला आहे.भविष्याचा वेध घेऊन आगामी काळात उद्भवणाऱ्या संकटाबाबत नवीन पिढीने खबरदारी बाळगण्याचे संकेतच भार्गवच्या कार्यातून प्रतिबिंबित होतात.