शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मेणाच्या कोटिंगचे सफरचंद ठरताहेत आरोग्यासाठी घातक

By admin | Updated: May 8, 2017 00:58 IST

जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे.

मृत्यूची खाई : आकर्षणासाठी व्हॅक्सचा वापर लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे. चवदार टरबूजातही लाल रंगाचे रासायनिक पदार्थ इंजेक्शनने टाकून लोकांच्या जीविताशी रोज खेळ खेळल्या जात आहे. आरोग्याला पोषक असलेल्या सफरचंदमध्येही सहजतेने उपलब्ध होणाऱ्या चॉकलेटी मेनाचे कोटींग करून सफरचंदद्वारे घराघरांत विष पोहोचविण्याचा प्रकार सुरु आहे. विशेषत: या सफरचंदला बाजारात मोठी मागणी असून हे फळ २०० ते ३०० रुपये किलोने विकले जात आहे. लालसर काळ्या रंगाचे सफरचंद जादा दिवस टिकावे, ते खराब होऊ नये, यासाठी या ठिकाणाहून सफरचंदचा स्टॉक गोंदिया येथे येतो. तेथूनच चॉकलेटी रंगाचा मेनाचा सफरचंदवर कोटींग केले जाते. मात्र नागरिकांना कल्पनाही नसेल, अशा प्रकारे आरोग्याला अत्यंत हानीकारक असलेले हे सफरंदला लावलेले मेन अनेक आजार बळावतात. गोंदिया शहरात अनेक फळविक्रेते आहेत. शहराला फळांचा पुरवठा होतो. बाजारात अनेक प्रकारचे सफरचंद विक्रीस असून हे सफरचंद टवटवीत दिसण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल फळविक्रेते लढवितात. यामध्ये फळांवर खासगी दुकानातून आणलेले स्टिकर लावून ते फळ कुठल्याही दर्जाचे असले तरी यूएसए व इतर देशातून ही फळे आली असल्याचे त्या स्टिकरवर नमूद असते. ही फळे बेभाव विकली जातात. नियमित व्हॅक्स (मेन) लावलेली सफरचंद खाण्यात आल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. पोट दुखणे, लहान मुलांची वाढ खुंटने व काही कालावधीनंतर कर्करोगही होण्याची शक्यता असते. सफरचंदामध्ये क जीवनसत्त्व सफरचंदमध्ये क जीवनसत्त्व असते. तसेच त्यामध्ये डी कॉम्प्लेस ग्रुप असते. हे आहारात घेतल्याने आयर्न (लोह) मिळते. यामुळे शरीरात रक्तवाढीस मदत होते, असे डॉक्टरांचे मत आहे. जर फळे खायची असेल तर गरम पाण्याने वरील लेप धुऊन, पुसून काढावे. नंतरच ती फळे खावी. आरोग्याला पोषक असलेली फळे घातक सफरचंद मध्ये मानवी शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असल्यामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. परंतु कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या चॉकलेटी मेनाचा वापर करून ही फळे चमकवितात. त्यामुळे कर्करोगासारखे आजार रोज विकला जात आहे. काश्मीरमधून येतात सफरचंद काश्मीरातून सफरचंद येते. मात्र फळे विक्रेते स्थानिक पातळीवर स्टिकर लावून ते फळी विदेशातून आल्याचे सांगण्यात येते. दीर्घकाळ टिकावा म्हणून सफरचंदवर चॉकलेटी व्हॅक्स लावले जाते. रसायनिक प्रक्रियेतून तयार केलेले मेन आरोग्याला हानीकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.