शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सर्रा व परिसरातील तलावांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:25 IST

सर्रा, कोडेलोहारा, मारेगाव, मुरमाडी, सोमेखारी, नवेझरी सहित १० ते १५ गावात पावसाळ्याच्या पाण्याचे दगा दिल्याने नागरिकांना जीवन जगण्याची, पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या चाºयाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ...

ठळक मुद्देपाऊस पडलाच नाही : जानेवारी महिन्यातच पाणी पेटणार

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : सर्रा, कोडेलोहारा, मारेगाव, मुरमाडी, सोमेखारी, नवेझरी सहित १० ते १५ गावात पावसाळ्याच्या पाण्याचे दगा दिल्याने नागरिकांना जीवन जगण्याची, पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या चाºयाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गाव सोडून पळण्याची पाळी तर येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सर्रा सह परिसरातील गावात असलेले तळे कोरडे पडले असल्याने जानेवारी महिन्यातच पाणी पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.तिरोडा तालुक्यातील साकोली मार्गावर असलेला सर्रा गावात पाण्याअभावी श्रीकृष्ण जन्माष्टमीला कोरड्या तलावात कान्होबा विसर्जनासाठी ठेवण्यात आले होते. शेवटी पावसाळ्यात पाऊस आलाच नाही. त्यामुळे आजपर्यंत जशीच्यातशी अवस्था आहे. गणपती आणि नवदुर्गा कोरड्या तळ्यात ठेवून बाहेरील पाणी आणून विसर्जित करण्यात आले होते.सर्रा गावासहित अनेक गावातील शेतात धान पिकाची लागवड करण्यात आली नाही. तळ्यात थेंब भर पाणी दिसून येत नाही. पावसाळा लागण्यापुर्वी गाव तळ्याची स्थिती जशी होती आज पावसाळा संपला तरी तशीच आहे. संपूर्ण पावसाळा गेला तरी तळ््यात खेंब भर पाणी जमा झाले नाही असे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.गणपती आणि नवदुर्गा विसर्जना करिता थेंब भर पाणी नसल्याने कोरड्या तळ्यात मुर्ती ठेवून जवळच्या देवानंद गोसाई यांच्या बोअरवेल मधून पाईपद्वारे पाण्याची व्यवस्था करून विसर्जनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच चिंतेची बाब ठरली आहे. जल स्वराजमधून तयार झालेली विहिर बंद होण्याच्या स्थितीत आहे. पाण्याचा ढोला दोन तासांमध्ये भरत असे मात्र पाण्याची पातळी खाली गेल्याने आजत्याला पाच तास लागत आहेत. ढोल्याचे पाणी पिण्याकरिता तर घरच्या विहिरींचे पाणी गुराढोरांकरिता उपयोगात आणायचे आहे. कसेबसे उपलब्ध होणारे पाणी डिसेंबर-जानेवारीपर्यंत पुरेल यानंतर गंभीर संकट निर्माण होणार असल्याचे सरपंच घासीराम पटले यांनी सांगीतले.इंदिरानगराची समस्या गंभीरइंदिरानगर (सर्राटोली) येथे ५० घरांची वस्ती असून पिण्याच्या पाण्यासाठी आजही कठीण स्थिती आहे. या ठिकाणी विहिरी व अनेक बोअरवेल खोदण्यात आल्या. परंतु कोठेही पाणी लागले नाही. सर्रा गावात दोन एकर शेती लावण्यात आली होती. ती सुद्धा पाण्याअभावी नष्ट झाली.अधिकाºयांची भेट नाहीकान्होबा विसर्जनावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी गावाला भेट दिली होती. यावेळी पं.स.सभापती उषा किंदरले आणि जि.प. सदस्या सुनीता मडावी यांनी भेट दिली होती. त्यानंतर कोणत्याही अधिकाºयांनी भेट तर दूर साधी विचारपूस करण्यात आली नाही असे सरपंच पटले यांनी सांगितले.रोजगार उपलब्ध करावेसतत दोन वर्षापासून सर्रा गावासहित परिसरात दुष्काळाचे संकट नागरिक झेलत आहेत. शेतात धान्य नसल्याने प्रशासनाने तात्काळ रोजगार उपलब्ध करुन दयावे अशी मागणी उपसरपंच पुष्पराज पारधी, सदस्य हस्तकला येडे, जयदेव गौतम, कंठीलाल पटले, पो.पा. कुंवरलाल पटले, भाऊदास पटले आणि तंमुस अध्यक्ष पुरनलाल पारधी यांनी केली आहे.