शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंद जलाशयातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: August 13, 2014 23:57 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकरी व मासेमाऱ्यांना फटका पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे. पण रपट्यावरुन पाणी व्यर्थ वाया जात असल्याचे चित्र आहे. हे पाणी शेतीच्या उपयोगात न येता नाल्यात वाहत जात असून त्याचा अपव्यय होत आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र येथील अभियंता बघ्याची भूमिका घेत आहेत. मागील १० वर्षांपासून कालव्याची सफाई करण्यात आली नसल्याने पांढरी ते म्हसवानी जाणारा कालवा पहिल्या पाण्यामुळे फोडला गेला. त्यामुळे पांढरी परिसरातील शेतकऱ्यांचे रोवणे व परे वाहून गेले. याचा जबाबदार कोण? याचा मोबदला चुलबंद जलाशय विभाग करणार काय? या परिसरामध्ये पुर्वी अभियंता झा कार्यरत असताना कालव्याची व रपट्याची सफाई होत असत. परंतु ते गेल्यानंतर येथे येणारे अभियंता मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सुरूवातीपासूनच कालवा फुटलेला आहे. हे मात्र त्यांच्या नजरेत येत नाही. चुलबंद जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स व्यवसाय चालत असतो. रपट्यावरुन पाणी जात असल्यामुळे येथील मासे सुद्धा नाल्यात वाहून जात आहे. यामुळे मात्र या जलाशयात मासे टाकणाऱ्या मत्स संस्थांचे चांगलेच नुकसान होत आहे. अगोरदरच मत्स्य व्यवसाय डबघाईस निघालेला असताना अशा प्रकारे मासेमारांचे नुकसान होत असल्याचे दिसते. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच लवकरात लवकर दुरूस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे (वार्ताहर)