शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पळसगाव (डव्वा) येथे पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:19 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्ण पणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देउपाय योजना करण्याची गरज : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कमुरदोली : सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्ण पणे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत मुंढरीटोला, आकारटोली, कुंभारटोली, माताटोली या गावांचा समावेश आहे. या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारावर आहे. गावात १८ बोअरवेल, ७ विहिरी आहेत. मात्र एप्रिल महिन्यातच गावातील विहिरी कोरड्या पडल्या असल्याने गावकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागीलवर्षी सुध्दा गावकºयांना याच कालावधीत पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. तेव्हा सरपंच डॉ. भुमेश्वर पटले, उपसरपंच हिरालाल चवारे यांनी पुढाकार घेवून गावकºयांना टँकरने पाणी पुरवठा केला होता. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी पळसगाव ग्रामपंचायतला भेट देवून पाणी टंचाईचा आढावा घेतला होता. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना पळसगाव येथे दोन बोअरवेल खोदण्याचे निर्देश दिले होते. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अद्यापही बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले नसल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. माताटोली, पळसगाव येथे १ बोअरवेल असून तेथील पाणी काही प्रमाणात पाईप लाईनद्वारे टाकीत सोडून वाटप केले जाते. गावात पाणी टंचाई असल्याने बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर यावरुन बरेचदा वाद सुध्दा होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवून पाणी टंचाईची समस्या दूर करण्याची मागणी सरपंच डॉ. भुमेश्वर पटले, उपसरपंच हिरालाल चवारे, ग्रामपंचायत सदस्य सेवक बागडे, हिरामन तुमडाम, प्रमोद वैद्य, सिंधू जांभुळकर, प्रमिला कोकोडे, मेश्राम, झामेश्वरी, बाबुलाल रंगारी, रामचरण राऊत, राजाराम मेश्राम यांनी केली आहे.