शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बोअरमुळे वाढणार पाणी टंचाईची समस्या

By admin | Updated: March 6, 2015 01:45 IST

शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

केशोरी : शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शेतकरी विनापरवानगी एका शेतात दोन-तीन ठिकाणी मशीनव्दारे बोअर करून पाण्याचा उपसा अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येणाऱ्या गावातील विहिरींची पाण्याची पातळी कमी होऊन त्या आटत चालल्या आहेत. या प्रकाराने उन्हाळ्यात केशोरी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या परिसरात पाण्याची सिंचन व्यवस्था नसतानासुध्दा या भागातील शेतकरी उन्हाळी धानपीक घेतात. धानासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरण्यात येत आहे. तसेच एका बोअरवेलमधून पाणी पुरत नसल्याचे सांगून एक शेतकरी एका शेतावर दोन-दोन, तीन-तीन मशीनव्दारे बोअर करून जमिनीच्या भूगर्भातील पाण्याचा उपसा आवश्यकतेपेक्षा अधिक करीत आहेत.केशोरी येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होवून विहिरी पूर्णत: आटत चालल्या आहेत. आता फक्त मार्च महिना सुरू आहे. पूर्ण उन्हाळा अजून शिल्लक आहे. आताच विहिरीमधील पाणी आटत चालल्याने वेळीच प्रशासनाने याची दखल घेणे अपेक्षित आहे. अन्यथा मोठ्या भिषण संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही व पाण्यासाठी वनवन भटकावे लागेल.विनापरवानगीने शेतात बोअर खोदण्याऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यास बंदी घालण्यात यावी आणि गावाशेजारी लागून असलेल्या जमिनीमध्ये बोअर मारण्यास शासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)