शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नियोजन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:40 IST

लोकसहभागातून पाण्याचे नियोजन व संग्रहन करण्यासाठी पावसाचे पाणी जल व्यवस्थापनातून साठवणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देप्रशांत सांगळे : सालेकसा पाणलोट आराखडा अंमलबजावणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : लोकसहभागातून पाण्याचे नियोजन व संग्रहन करण्यासाठी पावसाचे पाणी जल व्यवस्थापनातून साठवणे आवश्यक आहे. यासाठी आतापासून व्यापक आराखडा व अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी केले आहे. ते येथे पाणलोट आराखडा अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.येथे पाणलोट आराखडा अंमलबजावणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एलीवन सोसायटी फार इन्फरप्रेन्सेड शिव एज्यकेशन (एसीड) जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय , तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.शिबिराला मार्गदर्शक म्हणून जी.बी. तोडसाम, तंत्र अधिकारी एस.एस. बन्सोड, प्रा.जी.एस.भदाडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशांत सांगळे म्हणाले की, येणाºया काळात पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करु शकते. दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण व पातळी कमी होत चालली आहे. पावसाने अनियमितपणा दाखविला. अल्पपावसामुळे भविष्यात पाणी साठा टिकवून ठेवणे सर्वात मोठे आव्हाण असते. पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत शासन प्रशासन स्तरावर नेहमी प्रशिक्षण दिले जाते.जलस्तरावर उपाय योजना सांगिेतल्या जातात. परंतु लोक सहभागाअभावी सर्व उपाय निरर्थक ठरतात. जर अशीच परिस्थिती चालत राहिली तर येणारा काळ आव्हानात्मक राहून शेतीसाठी पाण्याचे संकट तर निर्माण होईल त्याचबरोबर जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्यासह विविध उपयोगासाठी पाण्याचा मोठा संकट उभा होणार आहे. वेळेवर प्रभावी उपाययोजना व जलसाठ्याचा नियोजन करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभाग महाराष्टÑ शासन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावातील पाणलोट आराखडे अंमलबजावणी प्रशिक्षण अंतर्गत सालेकसा तालुक्यातील पिपरिया, रामटोला, साखरीटोला, महारीटोला, नवाटोला किंवा जांभळी या गावाची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगीतले.प्रत्येक गावात दोन शासकीय कर्मचारी व तीन पदाधिकारी अशा पाच लोकांना तीन दिवसांच्या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण देण्यात येईल असेही ते म्हणाले. संचालन एसीडचे राज्य समन्वयक राजकुमार रामटेके यांनी केले. आभार जांभूळकर यांनी मानले.