शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठ्याअभावी ‘जलसंकट’ ओढविणार

By admin | Updated: July 15, 2016 02:11 IST

चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे.

चुल्हाड (सिहोरा) : चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे. खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी शासनाला पावसाळा संपल्यानंतर वीज पुरवठा सुरू करणार कां, असा संतप्त सवाल केला आहे. सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी युती शासनाच्या काळात बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात आला. या प्रकल्पाने नदी पात्रातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपुर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. बावनथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाळ्यात प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. जुलै महिन्यात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येते. परंतु यंदा या प्रकल्पाचे भवितव्य व चित्र उलटे झाले आहे. वीज बिलाचे देयक करण्यात आले नसल्याने गेल्या वर्षापासून प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. पावसाने चांदपुर जलाशय भरण्याची आशा मावळली आहे. ३५-४० कि़मी. अंतरपर्यंत लांब असणाऱ्या लाभनडोह नाल्यावर जागोजागी सिमेंट प्लग बंधारे बांधण्यात आले आहे. यामुळे जलाशयात येणारा पाणी या बंधाऱ्यांनी अडविला आहे. या शिवाय बावनथडी नदी पात्रात आठ महिनेपर्यंत वाहणारे पात्र महिन्यावर आले आहे. राजीव सागर धरणाने पाणी अडविले आहे. यामुळे नदीचे पात्रात वाहणाऱ्या पाण्याने स्त्रोत बंदावस्थेत आले आहे. नदीच्या काठालगत असणाऱ्या गावातून येणारे पाणी आता स्त्रोत झाले आहे. यामुळे अल्प असणारे पाणी अत्यंत आवश्यकतेचे झाले आहे. नैसर्गीक पावसावर शेतकरी धानाची रोवणी करीत असले तरी या धान पिकाला जलाशयाचे पाणी दोनदा वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा संपला असताना चांदपुर जलाशयात ३५ फुट पाण्याची साठवणूक क्षमता असताना फक्त आठ फुट पाण्याची साठवणूक झाली आहे. यामुळे येत्या पाणी वाटपाच्या अंतिम कालावधीत शेतकऱ्यांना पाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने याची वेळीच दखल घेवून वीज पुरवठा सुरू करावा. (वार्ताहर)