शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपासून पाणी बंद

By admin | Updated: December 22, 2016 01:04 IST

शहरालगत कुंभारटोली मार्गावर ख ोदकाम केल्याने जलवाहिनीची मोडतोड करण्यात आली.

नागरिकांचा हल्लाबोल : रस्ते खोदकामात जलवाहिनीची मोडतोड आमगाव : शहरालगत कुंभारटोली मार्गावर ख ोदकाम केल्याने जलवाहिनीची मोडतोड करण्यात आली. यामुळे आमगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणारी योजना मागील चार दिवसांपासून बंद पडली आहे. याविरुद्ध नागरिकांनी केलेल्या हल्लाबोल नंतर जलवाहिणी दुरुस्तीचे कार्य प्रशासनाने सुरू केले आहे. आमगाव शहरातील नागरिकांना सुलभतेने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शहरातील विविध भागातून जलवाहिण्या घालण्यात आल्या. परंतु या जलवाहिण्यांची दुरुस्ती व देखभाल ग्रामपंचायत विभागाकडे असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वारंवार रस्ते बांधकाम व खोदकामात या जलवाहिण्यांची मोडतोड करण्यात येत आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. आमगाव कुंभारटोली मार्गावर मागील पाच दिवसांपासून रस्ते मार्गावर खोदकाम कंत्राटदाराने सुरू केले आहे. त्यामुळे या खोदकामात मोठ्या प्रमाणात जलवाहिण्यांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणीपूर्तता मागील चार दिवसांपासून बंद पडली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंद पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. परंतु खोदकाम करणारे कंत्राटदार व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांचा रोष शिगेला पोहोचला आहे. पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची होणारी पाण्याची कोंडी दूर करण्याऐवजी रस्ते खोदकाम विभाग, कंत्राटदार व ग्रामपंचायत प्रशासनाने हात वर करण्याचे प्रयत्न केले. याविरुद्ध यशवंत मानकर यांच्या पुढाकाराने बांधकाम ठिय्यावर हल्लाबोल करणयात आले. यावेळी राकेश शेंडे, क्रिष्णा चुटे, रघुनाथ भुते, मुन्ना गवळी, संजू खोटेले, बबलू येटरे, आनंद गळपांडे, अल्ताफ कुरैशी, पप्पु लिल्हारे, श्यामराव पराते, बंटी मामा, हरिष खरखाटे, गणेश महारवाडे, उत्तम नंदेश्वर यांनी खोदकाम करणारे कंत्राटदार, जीवन प्राधिकरण अभियंता व ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरुन पाणी पुरवठा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. यानंतर कंत्राटदार व ग्रामपंचायत प्रशासनाने जलवाहिणी दुरुस्तीचे काम लगेच सुरू केले. (शहर प्रतिनिधी) कंत्राटी अभियंता व प्रशासनाची दिरंगाई आमगाव सह बनगाव पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिणी रस्ते खोदकामात मोडतोड करण्यात आली. यात लक्ष्मी इंजिनियरिंग, कंस्ट्रक्सन कंपनीचे कंत्राटी अभियंता उत्तम शिंदे, आमगाव ग्रामपंचायतचे प्रशासनाची दिरंगाई जलवाहिणी तोडण्यात आली. रस्ते खोदकाम सुरू असतानी उत्तम शिंदे सदर स्थळावर मुकदर्शक भूमिका घेतली. त्यामुळे जलवाहिणी तोडण्यात उशिर लागले नाही.