शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाड्याचे पाणी जाणार वाया?

By admin | Updated: June 3, 2016 01:37 IST

तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा १ च्या बॅरेजमध्ये सध्याच्या स्थितीत १.८४ दलघमी पाणी शिल्लक आहे.

साठा असूनही उपयोग नाही : १.३ दलघमी पाणी अतिरिक्तगोंदिया : तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा १ च्या बॅरेजमध्ये सध्याच्या स्थितीत १.८४ दलघमी पाणी शिल्लक आहे. बावनथडीतून दोन वेळा पाणी सोडल्यामुळे वैनगंगेच्या वाहत्या पाण्याचा तिथे जलसंचय सुरूच आहे. मात्र येथील अतिरिक्त ठरणारे पाणी इतर कोणत्याही उपयोगात न आणता केवळ पिण्यासाठीच वापरल्या जात असल्यामुळे ते पाणी बिनकामाचे ठरणार आहे.तिरोडा शहर आणि परिसराला ३० जूनपर्यंत पिण्याकरिता केवळ ०.५ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पावसाचे पाणी बरसणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा करता येईल एवढ्या पाण्याची व्यवस्था केली जाते. त्यानुसार धापेवाडा प्रकल्पात पिण्याचे पाणी राखीव ठेवल्यानंतर १.३ दलघमी पाणी शिल्लक राहते. सध्या शेतात खरीप हंगामाचे नियोजन केले जात असल्यामुळे शेतीला पाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत हे पाणी वीज निर्मितीसाठी अदानी उद्योग समुहाला दिल्यास काही प्रमाणात राज्याची विजेची गरज पूर्ण होऊ शकते. मात्र त्यादृष्टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे.वास्तविक उन्हाळ्यातील विजेची गरज लक्षात घेता अदानी प्रकल्पातील वीज निर्मिती बंद पडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने मध्यप्रदेश सरकारला विनंती करून बावनथडी प्रकल्पाचे पाणी दोन वेळा वैनगंगेच्या पात्रात सोडले. सुरूवातीला सोडलेले पाणी धापेवाडापर्यंत पोहोचण्याआधीच मुरले. मात्र नंतरचे पाणी बऱ्याच प्रमाणात धापेवाड्यात दाखल झाले. त्यानंतरही वैनगंगेचे वाहते पाणी धापेवाड्यात येणे सुरूच असल्यामुळे पाणीसाठा वाढत असल्याचे धापेवाडा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यासाठी राखीव ठेवूनही अदानी प्रकल्पाच्या वीज निर्मितीसाठी पाणी देणे शक्य होणार आहे. पिण्यासाठी राखीव ठेवल्यानंतर शिल्लक राहणारे १.३ दलघमी पाणी कोणत्याच उपयोगात न आणल्यास त्यातील बहुतांश पाणी बाष्पिभवन होऊन वाया जाणार आहे. त्याऐवजी ते वीज निर्मितीच्या उपयोगात आणल्यास राज्याला वीज मिळेल, अशी अपेक्षा अनेक सुज्ञ लोक व्यक्त करीत आहेत.यासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मोबाईल कॉल स्वीकारलाच नाही. या प्रकरणी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)