शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

परतून आलेल्या पावसाची धो-धो

By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST

दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे.

गोंदिया : दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे. मात्र शनिवारी (दि.६) रात्री पासून बरसत असलेल्या पावसाने रविवारीही (दि.७) हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा पाऊस बरसत होता. धान पिकासाठी पाण्याची खूप गरज असतानाच जिल्ह्यात शनिवारी (दि.६) पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावले आहेत. काही दिवसांपासून पाऊस न आल्याने पीक हातून जाणार की काय, या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले होते.मात्र मागील चार-पाच दिवसांपासून वरूणराज पुन्हा बरसू लागले. त्यात मागील २४ तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हलका पाऊस नोंदविण्यात आला आहे. रविवारी (दि.७) सकाळी ८ वाजतापर्यंत गोंदिया तालुक्यात ७.२ मिमी., गोरेगाव येथे ७, तिरोडा येथे ३, अर्जुनी/मोरगाव येथे ३, देवरी येथे ३०, आमगाव येथे ९.४, सालेकसा येथे २१ व सडक/अर्जुनी येथे २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १०५ मिमी. पाऊस नोंद करण्यात आला आहे. त्याची सरासरी १३.२ मिमी आहे. या पावसामुळे ज्या क्षेत्रात सिंचनाची सोय नाही त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानपिकांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे रविवारच्या पावसाने अवघ्या जिल्ह्याला झोडपून काढले आहे. देवरी तालुक्यात पावसाची रिमझीम वगळल्यास अन्य सातही तालुक्यांत चांगला पाऊस बरसल्याची माहिती आहे. रात्रीपर्यंत पावसाची ही रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे शेतकरी सुखावला असतानाच जिल्ह्यातील धरणांतही पाण्याच्या साठ्यात वाढ होण्यात मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)