शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनसाठी जागोजागी नाली व खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:40 IST

तिरोडा शहराचा विकास होत असतानाचा ३५ वर्ष जुनी पाईपलाईन बदलवून २७ कोटींची नवीन योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी जागोजागी नाल्या व खड्डे खोदले जात आहेत.

ठळक मुद्देशहरवासीयांची डोकेदुखी वाढली : खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तिरोडा शहराचा विकास होत असतानाचा ३५ वर्ष जुनी पाईपलाईन बदलवून २७ कोटींची नवीन योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी जागोजागी नाल्या व खड्डे खोदले जात आहेत. या नाल्या उघड्याच पडलेल्या असून त्यापासून कधीही धोका होऊ शकतो. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष असून शहरवासीयांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. करिता त्वरीत नाल्या बुजविण्याची मागणी केली जात आहे.शहरातील नवीन योजनेंतर्गत पाण्याच्या ३ टाक्या व नवीन पाईपलाईन टाकायची आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात मधील नाली बुजविली जाते परंतु टोकाजवळील भाग हा न बुजविता खुला ठेवण्यात येत आहे. ही नाली तीन फुट खोल व पाऊन फुट रुंद अशी असल्याने लहान मुले अथवा जनावरे यात पडल्यास जीवीतहानी होऊ शकते. प्राप्त माहितीनुसार, कंत्राटदार किंवा त्यांचे प्रमुख सकाळीच काम समजावून देतात व नंतर कधी फिरकत नाही. मजूर वर्ग आपल्या मनमर्जीनुसार कासवगतीने काम करीत असतात. कित्येक ठिकाणी नाली बुजविण्याचे काम कसे तरी केले जाते. तर कित्येक ठिकाणी नाल्या बुजविल्याच जात नाही. रहिवासी परिसर असल्याने लहान मुले, वृद्ध व नागरिक वावरतात. अशात त्यांचा अपघात होऊ शकतो. करिता तत्काळ नाल्या व खड्डे बुजविण्यात यावे अशी शहरवासीयांची मागणी आहे.पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या नाल्या व खड्डे बुजविण्याची सूचना कंत्राटदारास देऊन खड्डे बुजविण्यास सांगते.- सोनाली देशपांडे, न.प.अध्यक्षपाईपलाईनचे काम सुरु असल्याने नाली व खड्डे उघडे आहेत. ती कामे पूर्ण करीत असतानाच नाली व खड्डे बुजविण्यात यावेत याबाबत मी कंत्राटदारास सांगतो.-जी.जी.सोनवाने, शाखा अभियंता, मजिप्रा, तिरोडा