शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

१० गावांत एसटीची प्रतीक्षा

By admin | Updated: June 1, 2015 01:43 IST

एसटी विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे.

आमगाव : एसटी विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. देवरीवरुन साखरीटोला व्हाया वळद, सोनेखारी मार्गे ठाणा गोंदिया ही एसटी बस सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. जवळपास १० गावांत एसटीची सेवा देण्याची मागणी होत आहे. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान अनेक वर्षांपासून होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.देवरी मार्गे साखरीटोला, वळद, पानगाव, कवडी, सोनेखारी, कटंगटोला, पिपरटोला, जांभूरटोला, आसोली, कोसमटोला, ठाणा पुढे गोंदिया अशी बस सेवा दोन फेरीत सुरू झाली तर १० गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. एस.टी. विभागाला लाख रुपये मिळतील. ठाणा येथे वळणावर गाडी मोडत नाही असे निमित्त पुढे करुन ही बस सुरू करीत नाही. काही तरी कारण समोर करुन बस सुरू न करणे म्हणजे कर्तव्यात कसूर आहे. प्रवाशांच्या समस्येचा विचार करुन या १० गावातील नागरिकांना याचा निश्चित फायदा होईल याकरिता तत्काळ या मार्गावर बस सुरू करावी अशी मागणी किशोर रहांगडाले, जियालाल पंधरे, दीनदयाल चौरागडे व अनेक नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे मानव विकास मंडळाची बस या रस्त्यावर वळते मात्र सामान्य प्रवाशांची एसटी या मार्गावरून का वळत नाही असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)