शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

बोनसची प्रतीक्षा संपली, दुसऱ्या टप्प्यात ३३६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:35 IST

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ...

गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र, ५० टक्के बोनसची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना ५० टक्के बोनसची रक्कम मिळेल, असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला असून, राज्य सरकारने सोमवारी (दि. ६) बोनसचा दुसऱ्या टप्प्यात ३३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. खा. प्रफुल्ल पटेल हे शेतकऱ्यांना बोनस मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होेते. त्यांनी गोंदिया - भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस मिळणारच, अशी ग्वाही दिली होती. त्याची पूर्तता करीत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३३६ कोटी रुपयांचा निधी बोनससाठी उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे आर्थिक संकटातील पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी, यासाठी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे हे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. बोनसची रक्कम प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहेत.

.................... ...

...असे होणार बोनसच्या रकमेचे वितरण

मागील खरीप हंगामातील बोनसची ५० टक्के रक्कम शासनाकडे प्रलंबित होती. ती आता उपलब्ध करुन दिली असून, गोंदिया ११२ कोटी ३६ लाख, भंडारा १२८ कोटी १९ लाख, चंद्रपूर २७ कोटी ८० लाख, गडचिरोली २७ कोटी ७२ लाख, नागपूर १८ कोटी रुपये आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी असा एकूण ३३६ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.