शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

लेखाधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी

By admin | Updated: July 9, 2017 00:11 IST

नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखा परीक्षक पदावर रूजू झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर गेलेल्या लेखाधिकाऱ्यांनी आता थेट स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देऊन टाकला आहे.

पालिका प्रशासनाला दिला अर्ज : काहीच दिवस राहिले कामावर लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखा परीक्षक पदावर रूजू झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर गेलेल्या लेखाधिकाऱ्यांनी आता थेट स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देऊन टाकला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या लेखा विभागाचा कारभार प्रभारावरच चालणार आहे. स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिल्याने लेखाधिकाऱ्यांना गोंदिया नगर परिषद भावली नाही असेच म्हणावे लागणार आहे. नगर विकास प्रशासनाने अवघ्या राज्यातच स्थानांतरणाची मोहीम राबवीली. यात गोंदिया नगर परिषदेतील राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बाहेर स्थानांतरण करण्यात आले. कर्मचारी गेले तेवढे कर्मचारी नगर परिषदेत रूजू झाले नाहीत. मात्र रूजू झालेले कर्मचारी सुट्या टाकून आता पळ काढू लागले असल्याचे प्रकार नगर परिषदेत दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाने नगर परिषदेतील महत्वपूर्ण विभाग रिकामे झाले आहेत. अशातच नगर परिषदेच्या लेखा विभागातील लेखाधिकारी प्रदीप अग्निहोत्री यांचे स्थानांतरण झाले. अगोदरच लेखापरिक्षकांचे पद रिकामे होते. त्यामुळे अग्निहोत्री यांच्या जागेवर आलेले सुधाकर काळे यांना लेखाधिकारी व लेखापरिक्षक अशी नियुक्ती देण्यात आली. माहितीनुसार, २ जून रोजी काळे येथे रूजू झालेत. आता त्यांना नगर परिषदेचे वातावरण भावले नाही क ी काय झाले, मात्र ७ जून पासून ते वैद्यकीय रजेवर गेले होते. आता साहेबच सुट्टीवर गेले त्यामुळे विभागाचा कारभार विस्कळीत झाला. त्यामुळे रोखपाल दुबे यांच्याकडे सध्या लेखापरिक्षक व लिपीक जयप्रकाश भेंडारकर यांच्याकडे लेखाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे. नगर परिषदेत अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यात लेखाधिकारी सुट्टीवर गेल्याने लेखा विभागाचा कारभार विस्कळीत झाला होता. मात्र साहेब काही दिवसांनी येथील अशी आशा बाळगून विभागातीलच कर्मचाऱ्यांना प्रभार देऊन कामकाज चालविले जात होते. आश्चर्याची बाब अशी की, ४ जुलै रोजी काळे नगर परिषदेत आले व यावेळी त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचाच अर्ज दिला असल्याची माहिती आहे. नरखेड येथून स्थानांतरण होऊन काळे येथे आले होते. मात्र त्यांना गोंदिया नगर परिषद भावली नसावी व त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. माहितीनुसार, काळे यांना निवृत्तीसाठी कालावधी आहे. मात्र आता त्यांच्या काही वैयक्तीक कारणांमुळेच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा टोकाचा निर्णय घेतला असावा असेच म्हणता येईल. विद्युत विभागही वाऱ्यावर नगर परिषदेच्या विद्युत विभागातील अभियंता मारवाडे यांचे स्थानांतरण तिरोडा नगर परिषदेत करण्यात आले. मात्र अद्याप त्यांच्या जागेवर कुणीही आलेले नाही. परिणामी विद्युत विभागही वाऱ्यावरच दिसत आहे. विद्युत विभाग नगर परिषदेतील महत्वाचा विभाग आहे. आज या विभागात जबाबदार अधिकारी नसल्याने काही अडचण निर्माण झाल्यास मात्र पंचाईत होणार आहे. आता या विभागासाठी कधी अधिकारी येतात हे सांगणे ही कठीण आहे.