शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल सर्दी-तापाचे संकट; रुग्णालयांमध्ये वाढली मुलांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

गोंदिया : कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुलांवर वातावरणाचा परिणाम होत असून, ...

गोंदिया : कधी ऊन तर कधी पाऊस यामुळे सतत वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुलांवर वातावरणाचा परिणाम होत असून, घरोघरी तापाची साथ पसरली आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे आढळणारे रुग्ण घरोघरी दिसत आहेत, परंतु आपल्याला कोरोना तर झाला नाही या धास्तीत असलेल्या लोकांनी चाचणी केल्यावर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातही डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. मलेरियाचेही रुग्ण पुढे येऊ लागले आहेत. व्हायरल फिव्हरचा जोर असल्याने गावागावात सर्दी-तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. उपचारासाठी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंतचे रुग्णालय हाऊसफुल्ल होताना दिसत आहेत.

...................

ही घ्या काळजी

एखाद्या घरातील व्यक्तीला ताप आला किंवा सर्दी झाली तरीही त्या व्यक्तीला सामान्य लोकांपासून थोडे वेगळे ठेवा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, ताप येणाऱ्या व्यक्तीसोबत राहताना घरातील इतर व्यक्तींनी आपली काळजी घ्यावी.

............

कोरोना नाही; डेंग्यूचे संकट वाढते

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, परंतु डेंग्यूने पाय पसरणे सुरू केले आहे. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू पसरला आहे. डेंग्यूमुळे यंदा छोट्या गोंदियातील एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.

......................

गोंदियातच हजारो मुले आजारी

रुग्णालय----------------------ओपीडी-------------------दाखल बालरुग्ण

केटीएस--------------------------६६८३........................... ६६

बाई गंगाबाई स्त्री----------------२१३३...........................४२

तिरोडा उपजिल्हा रुग्णा.--------२२५०............................३७

ग्रा. रु. आमगाव------------------१७५८----------------------०५

ग्रा. रु. देवरी----------------------१३८१----------------------०९

ग्रा.रु. चिचगड---------------------८३७------------------------०२

ग्रा. रु. सडक-अर्जुनी--------------२३८६------------------------०४

ग्रा. रु. सौंदड------------------------८००------------------------०१

ग्रा. रु. नवेगावबांध----------------१४८९-------------------------०४

ग्रा. रु. अर्जुनी-मोर----------------३२३६--------------------------०८

ग्रा. रु. रजेगाव---------------------१०२२--------------------------०५

ग्रा. रु. सालेकसा-------------------२६७३--------------------------०३

ग्रा. रु. गोरेगाव---------------------१३१२--------------------------०२

...................

कोट

सध्या व्हायरल फिव्हर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. डेंग्यू व ब्रेन मलेरियाचेही रुग्ण वाढत आहेत. लहान बाळांना अस्थमा सारखा आजार दिसून येत आहे. लहान मुलांवर व्हायरल फिव्हर जोर पकडत आहे. यंदा डायरिया व डिसेन्ट्रीचे प्रमाण नगण्य आहे.

- डॉ. प्रदीप गुजर, बालरोगतज्ज्ञ, गोंदिया.