शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे बंद असल्याने गाव रात्रीला अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

नवेगावबांध : गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी ७ जुलै रोजी कापली आहे. परिणामी ...

नवेगावबांध : गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी ७ जुलै रोजी कापली आहे. परिणामी आता रात्रीला गाव अंधारात राहत असून गावकऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात आता विषारी कीटकांचा धोका वाढला असून ग्रामपंचायतने व शासनाने त्वरित तोडगा काढून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

पूर्वी पथदिव्यांचा वीजबिल भरणा जिल्हा परिषद करीत होती. राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून आकारण्यात येणाऱ्या विविध कर व विकास निधीतून वीज वितरण कंपनीला वीजबिलाची रक्कम वळती करण्याबाबतचा निर्णय अलीकडेच घेतला होता. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीमधील पथदिव्यांचे थकीत आणि बंदीत अनुदानातून पाणीपुरवठ्याचे वीजबिल ग्रामपंचायतने भरावे, असे शासनाने आदेशित केले होते. परंतु असे केल्यास ग्रामपंचायत अंतर्गत इतर विकासकामांना निधी उरणार नसून गावातील विकासकामांवर निधी खर्च करता येणार नाही, असे जिल्हा सरपंच सेवा संघाचे म्हणणे आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मोलमजुरी नाही, हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, रोजंदारी मजूर व छोटे-मोठे व्यापारी या सर्वांचेच आर्थिक हाल झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतकडे येणारे विविध प्रकारचे कर नागरिकांनी भरले नसून ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून गावात भुरट्या चोऱ्यादेखील झाल्या आहेत व गावात अंधार असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन पथदिवे त्वरित सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

--------------------------------

वीजबिल शासनाने भरावे

नवेगावबांध ग्रामपंचायतकडे १२ बिलांचे ४१ लाख १२ हजार ९५४ रुपये थकीत आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीकडून १७ जून रोजी ग्रामपंचायतला बिल भरण्यासाठी नोटीस देऊन १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने पथदिव्यांची जोडणी कापली. गावातील वीजबिलांचा भरणा झाल्याने वीज जोडणी कापण्याचे प्रकार राज्यातच घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने वीजबिल भरावे व यासाठी आमदारांनी राज्य सरकारकडे हा प्रश्न लावून धरणे गरजेचे आहे, अशी मागणी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.