शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

विदर्भ एक्स्प्रेस निश्चित करते सोनोग्राफीची डेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:23 IST

येथील बहुतेक शासकीय कार्यालयाची वेळ विदर्भ एक्स्प्रेस ठरविते. मात्र आता बाई गंगाबाई रुग्णालय सुध्दा याला अपवाद राहिले नाही. सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना सुध्दा विदर्भ एक्स्प्रेसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचीे धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देबीजीडब्ल्यू रुग्णालयातील प्रकार : गर्भवती महिलांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बहुतेक शासकीय कार्यालयाची वेळ विदर्भ एक्स्प्रेस ठरविते. मात्र आता बाई गंगाबाई रुग्णालय सुध्दा याला अपवाद राहिले नाही. सोनोग्राफी करण्यासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना सुध्दा विदर्भ एक्स्प्रेसची प्रतीक्षा करावी लागत असल्याचीे धक्कादायक बाब पुढे आली आहे. सोनोग्राफीसाठी डेट देण्याची जबाबदारी ज्या कर्मचाºयाकडे आहे. ते नागपुरवरुन अप-डाऊन करतात. त्यामुळे सकाळी विदर्भ एक्सप्रेस येईपर्यंत गर्भवती महिलांना रुग्णालयात त्यांची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नसतो.जिल्ह्यातील एकमेव असलेले बाई गंगाबाई महिला रुग्णालय नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरुन प्रकाश झोतात असते. एकमेव सरकारी महिला रुग्णालय असल्याने जिल्हाभरातील रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे नेहमीच महिला रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो. दर मंगळवार आणि शुक्रवारी या रुग्णालयात गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. यानंतर वैद्यकीय अधिकारी तपासणी करुन त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतात. मात्र बरेचदा सोनोग्राफी करणारे तज्ञ कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने गर्भवती महिलांना आल्या पावलीच परत जावे लागते. गुरूवारी (दि.३) गर्भवती महिला तपासणी करण्यासाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयात पोहचल्या. वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करुन त्यांना सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी करणारे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र कोणत्या ताररेखला गर्भवती महिलांची सोनोग्राफी करायची आहे हे सांगणारा टेक्नीशीयन उपस्थित नव्हता. त्यामुळे ते येईपर्यंत गर्भवती महिलांना प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यापैकी काही महिलांनी टेक्नीशीयन विदर्भ एक्सप्रेस आल्याशिवाय येणार नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे रुग्णालयात दुपारी १२.३० वाजेपर्यंत रुग्णांना तपासणी करिता चिठ्या दिल्या जातात. दुपारी १ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळे टेक्नीशीयन जर रुग्णालयात उशीरा पोहचला तर सोनोग्राफीसाठी आलेल्या महिलांना आल्यापावलीच परत जावे लागते. ही समस्या नेहमीचीच असल्याचे काही महिलांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. महिलांनी याची तक्रार बीेजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे केली. मात्र त्यांनी सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे.गरीब रुग्णांना भुर्दंडयेथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्ह्यातील दूरवरुन गर्भवती महिला उपचार व तपासणीसाठी येतात. मात्र कधी वैद्यकीय अधिकारी गैरहजर तर कधी सोनोग्राफी करणारा टेक्नीशीयन वेळेवर पोहचत नसल्याने त्यांना आल्यापावलीच परत जावे लागते. त्यामुळे येण्या जाण्याचा आर्थिक भुर्दंड सुध्दा सहन करावा लागतो. या रुग्णालयातील बहुतेक वैद्यकीय अधिकारी विदर्भ एक्सप्रेसने अप-डाऊन करीत असल्याची बाब आता लपून राहीलेली नाही.ढेकवार हे टेक्नीशीयन आहेत मात्र गुरूवारी (दि.३) ते वेळेवर रुग्णालयात पोहचले नाही. शिवाय त्यांनी याची माहिती दिली नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करता आली नाही. केवळ सोनोग्राफीची डेट घेण्यासाठी गर्भवती महिलांना बसून राहावे लागले. यासंदर्भात सदर टेक्नीशीयनला विचारणा करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.- डॉ.कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक बीजीडब्ल्यू रुग्णालय.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल