शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

आमगावची वैष्णवी शेेंडे जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 01:04 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने जिल्ह्यात सर्वाधिक ९५.५४ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी भ्रमर संजय पुस्तोडे याने ९४.३० टक्के गुण घेऊन द्वितीय तर तिसरा क्रमांक आमगावच्या आदर्श कनिष्ठ विद्यालयातील कस्तूरी विनायक अंजनकर हिने ९३.६९ टक्के गुण घेऊन पटकाविला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील २२ हजार ४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र प्रत्यक्षात २२ हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात नागपूर विभागीय मंडळात गोंदिया जिल्हा यावर्षी दुसऱ्या स्थानावर आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ३८६ विद्यार्थी कला शाखेचे होते. त्यापैकी ८८०३ विद्यार्थी (८४.७६ टक्के) उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेतून १० हजार २४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९९१९ (९६.७९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तसेच वाणिज्य शाखेतून ९६४ पैकी ८५८ (८९ टक्के) तर व्होकेशनल शाखेतून परीक्षा देणाऱ्या ४३३ पैकी ३३७ (७७.८३) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही मुलींनी बाजी मारत मुलांपेक्षा आम्ही सरस आहोत, हे सिद्ध केले. परीक्षा देणाऱ्या १० हजार ८७७ मुलांपैकी ९६३८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर ११ हजार १५४ मुलींपैकी १० हजार २८९ मुलींनी यश मिळविले आहे. यंदा केवळ १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात ग्रामीण भागातील शाळा जास्त आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा चार टक्क्याने निकालात पुढे आला आहे. तर यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून सर्वाधीक ९३.८३ टक्के निकाल लागला असून द्वितीय क्रमांकावर आमगाव तालुका ९३.५३ टक्यावर आहे. निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे मागील वर्षी नागपूर विभागात तृतीय क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा यंदा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. वैष्णवी शेंडेला व्हायचयं डॉक्टर आमगाव : बारावी विज्ञान शाखेतून आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वर्ग एक ते चार पर्यंतचे तिचे शिक्षण के.के.इंग्रजी शाळेत घेतले असून ती इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण आदर्श विद्यालयातच घेत आहे. कठीण परिश्रम व आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळविता येते असे वैष्णवीने लोकमतशी बोलताना सांगीतले. भवभूती शिक्षण संस्थेच्या रूपात स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरूजींनी लावलेले रोपटे आज विशाल वटवृक्ष झाले आहे. माजी आमदार केशवराव मानकर यांच्या नेतृत्वात तसेच सुरेशबाबू असाटी यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या आदर्श विद्यालयाने डॉक्टर, इंजिनीयर, नेते, पत्रकार व सर्वोच्च पदावर जाणारी सर्वच माणसे घडविली आहे. आमगावच्या या विद्यालयातील विद्यार्थी अनेकदा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवितात. उत्कृष्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे येथील निकाल चांगला असतो. निकाल लागताच प्राचार्य दिनेश राऊत, उप प्राचार्य अश्वीनी जोशी, पर्यवेक्षक सि.बी.पारधी व शोभा येडे यांनी वैष्णवीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.