शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील युरिया व्हाया सालेकसा छत्तीसगडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

गोंदिया : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही विक्रेते त्याची अधिक दराने विक्री करीत आहेत. ...

गोंदिया : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही विक्रेते त्याची अधिक दराने विक्री करीत आहेत. तर सालेकसा, आमगाव, देवरी या तालुक्यांतून युरिया मोठ्या प्रमाणात छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात पाठविला जात आहे. तेथील विक्रेते थेट जागेवरून २६७ रुपयांच्या युरियाची ३५० रुपयांत उचल करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे कृषी विभागाकडून सुद्धा त्याच दृष्टीने नियोजन केले जाते. यंदा कृषी विभागाकडून जेवढे नियतन मंजूर करण्यात आले. तसेच महिन्यानुसार खताची मागणी नोंदविली होती त्यापेक्षा सुद्धा अधिक प्रमाणात युरियाचा पुरवठा जिल्ह्याला करण्यात आला. तर १९०० मेट्रिक टनाचा बफर स्टॉक सुद्धा रिलीज करण्यात आला. आतापर्यंत जवळपास १३ हजार मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला आहे. मात्र यानंतरही शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याची ओरड आहे. तर काही विक्रेते युरियासह संयुक्त खते घेण्याची सक्ती करीत आहेत. यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. विशेष म्हणजे काही कंपन्या विदर्भ मार्केटिंग फेडरेशनला कमी प्रमाणात खत देत असून, काही वितरकांवर मेहरबानी दाखवित आहेत. या सर्व प्रकाराची खोलात जाऊन माहिती घेतली असता देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्यांतून युरिया छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात पाठविला जात आहे. तेथील विक्रेते थेट जागेवरून ३५० प्रति बॅगप्रमाणे उचल करीत आहेत. तर विक्रेत्यांना सुद्धा शंभर रुपये अतिरिक्त मिळत असल्याने ते सुद्धा खुश असल्याची माहिती आहे. मात्र यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरियाच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

..............

ई-पास मशीनवर नोंद नाही

कृषी केंद्र संचालकांना खताची विक्री करण्यासाठी ई-पास मशीनवर नोंद आणि शेतकऱ्यांचे अंगठे घेणे अनिवार्य आहे. स्टॉक बुक आणि ई-पासवरील रेकाॅर्ड जुळणे आवश्यक आहे. मात्र काही विक्रेते ई-पासवर नोंदणीच करीत नसल्याचा प्रकार सुरू आला असून, १३ कृषी केंद्रांना कृषी विभागाने नोटीस सुद्धा बजावली आहे.

............

सीमा तपासणी नाक्यावर वॉच

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, सालेकसा या तालुक्यांतून युरिया खत मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जात असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील सीमा तपासणी नाक्यावर वाॅच ठेवण्याबाबतचे पत्र पोलीस विभागाला दिल्याची माहिती आहे.

..........

सखोल चौकशी केल्यास मोठे मासे लागतील गळाला

महाराष्ट्रातून मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणाऱ्या युरियाची सखोल चौकशी केल्यास यातील बराच अनागोंदी कारभार पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय, यातील मोठे मासे सुद्धा गळाला लागू शकतात.