शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस व गारपिटीचा रब्बी पिकांना फटका ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:29 IST

सालेकसा : मागील तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने रब्बी हंगामातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

सालेकसा : मागील तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने रब्बी हंगामातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी कावराबांध येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम बनोठे यांनी केली आहे.

तालुक्यातील कावराबांध, बिंझली, खोलगड, नानव्हा या भागात सोमवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास झालेल्या पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे कापणी रब्बी हंगामातील धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्याने धान पाखड आणि खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. त्यातच तालुक्यात सध्या रब्बी धानाची कापणी जोमात सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या धानाची कापणी पूर्ण झाली आहे. या धानाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे कृषी विभागाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

............

बॉक्स

कोरोटे यांनी केली नुकसानीची पाहणी

तालुक्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे धानाचे उभे पीक उद्‌ध्वस्त झाले. आमदार सहषराम कोरोटे यांनी कावराबांध बिंझली, घोन्सी या गावालगत नुकसानग्रस्त धान पिकांची पाहणी केली. तसेच कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे करून नुकसान अहवाल शासनाकडे पाठविण्यास सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार शरद कांबळे, नायब तहसीलदार एस. बी. उपरीकर, एस. के. गणवीर, डी. व्ही. ठाकरे, तलााठी सहारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, पुरुषोत्तम बनोठे, देवचंद ढेकवार, हरिलाल रत्नाकर व शेतकरी उपस्थित होते.

..........

कोट

ज्या शेतकऱ्यांच्या धानाचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले. त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी.

-पुरुषोत्तम बनोठे, शेतकरी