शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदलीस स्थगिती केव्हापर्यंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 00:15 IST

पाच वर्षांनंतर जि.प. गोंदिया येथे प्रशासकीय व विनंती बदली करण्यात आली. मात्र काही शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपली बदली ...

चौकशी कधी व केव्हा : जिल्हा परिषद प्रशासन बघ्याच्या भूमिकेतकरटी : पाच वर्षांनंतर जि.प. गोंदिया येथे प्रशासकीय व विनंती बदली करण्यात आली. मात्र काही शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपली बदली थांबविण्यासाठी बदलीवर स्थगिती मिळविली. आता ही स्थगिती कधीपर्यंत राहील व चौकशी कधी होईल, अशी समस्या बदली हवी असलेल्या शिक्षकांपुढे उभी ठाकली आहे.३ जून रोजी करण्यात आलेल्या बदलीमागे चांगला हेतू होता. त्यामुळे दुर्गम भागातील कार्यरत शिक्षक मुख्य प्रवाहात येणार, २० ते २५ वर्षांपासून जे शिक्षक शहराजवळील शाळेत कार्यरत आहेत ते दुर्गम भागात जातील व काही शाळेतील रिक्त पदे भरल्या जातील. तसेच ५२ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक आपल्या सोयीच्या शाळेत नियमानुसार जाणार, लहान शाळेतील शिक्षक मोठ्या शाळेत जाणार तर मोठ्या शाळेतील शिक्षक लहान शाळेत जाणार होते. मात्र काही शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून आपली बदली थांबविण्यासाठी बदलीवर स्थगिती मिळविली. पण बदलीची चौकशी केव्हा होणार? हे गुलदस्त्यात आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर बदली करणे प्रशासनास अवघड जाईलच व या सर्वात चघडल्या जाईल ते शिक्षकच. या अन्यायग्रस्त शिक्षकांची बाजू कोणीतरी ऐकणार काय? असा सवाल त्यांनी केला आहे. बदली झाल्यामुळे काही शिक्षकांनी आपले मुख्यालय स्थलांतरित केलेले आहेत. पण आजपर्यंत बदलीबाबत कोणतेच निर्णय झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षक चातकाप्रमाणे बदली आदेश केव्हा मिळेल याची वाट पाहत आहेत.