शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना विटांचे कारखाने जोमात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 01:37 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विटा तयार करण्याचा व्यवसाय पूर्वीपासून सुरू आहे.

बुडतोय महसूल : अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालताहेत व्यवसाय सौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विटा तयार करण्याचा व्यवसाय पूर्वीपासून सुरू आहे. मात्र आता नव्याने विटा व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने प्रत्येक व्यवसायिक शॉर्टकट मार्गाने कमी वेळेत विनापरवाना अवैध विटा व्यवसायाला चालना देत आहेत. त्यामुळे वातावरणात बराच बदल होत आहे. वीट भट्टीसाठी लागणारा कोंडा, वाळू, भसवा, माती यासाठी पर्यावरण खात्याचा परवाना लागतो. मात्र नियम धाब्यावर ठेवून ग्रामीण भागात वीट व्यवसायाला उधान आले आहे. विटा व्यवसायाला लागणाऱ्या मातीला रॉयल्टी लागते. विटा तयार भसवा (बारीक वाळू) चा समावेश असतो. त्यालाही रॉयल्टी लागते. विना परवाना (रॉयल्टी) नसूनही विटा तयार करणाऱ्यांचा कार्यक्रम जोमात सुरू आहे. सौंदड परिसरामध्ये वीट व्यवसाय चांगलाच जोमात आहे. विना परवाना अवैधरित्या दिवसेंदिवस होत असलेल्या कामांकडे शासन तातडीने लक्ष देणार का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. देशाच्या उन्नतीमध्ये लागणार पैसा हा महसूल विभागाकडून वसूल करून देश विकास केला जातो. मात्र काही कर्मचारी अवैध व्यावसायीकांकडे जावून दंडात्मक कारवाई न करता दंडाची अर्धी रक्कम घेऊन परतत आहेत. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध विटाभट्टीचे काम जोमात सुरू आहे. या प्रकारावर आळा घालण्याकरीता पथक तयार करून त्यांची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)