शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी दाखविली संपातून एकजूट

By admin | Updated: September 3, 2015 01:28 IST

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला.

कार्यालये पडली ओस : जिल्ह्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग, आर्थिक व्यवहार ठप्पगोंदिया : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. या संपात जिल्हाभरातील १० हजार कर्मचारी सहभागी झाले होते. एकाचवेळी सर्व कर्मचारी यात सहभागी झाल्याने सरकारी कार्यालये मात्र दिवसभर ओस पडली होती.नवीन अंशदाय पेंशन योजना रद्द करून निश्चित लाभाची वैधानिक पेंशन योजना पुर्नस्थापित करणे, कंत्राटी आणि नैमित्तीक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच तारखेपासून लागू करणे, श्रम आणि औद्योगिक कायद्याची अंमलबजावणी करणे, महागाई भत्याची थकबाकी त्वरित देण्यात यावी, केंद्राप्रमाणे वाहतुक भत्ता, होस्टेल भत्ता देण्यात यावा, केंद्राप्रामणे पाच दिवसांचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० करण्यात यावे, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न अविलंब सोडविण्यात यावे, केंद्रिय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यात यावे, महिला बाल संगोपन रजा मंजूर करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हा एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, म.रा. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, राज्य सरकारी/निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती, ग्रामसेवक संघटना, लेखा कर्मचारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना, नर्सेस कर्मचारी संघटना, अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना, रेखाचित्र संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, पशुचिकित्सा व्यवसायी संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना, अपंग कर्मचारी संघटना, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, तांत्रीक अभियंता संघटना, कृषी तांत्रिक संघटना, विस्तार अधिकारी शिक्षण संघटना, महासंघ महिला उपसमिती, अंशकालीन स्त्री परिचर संघटना, अंशकालीन स्त्री परिचर संघटना, तालुका महासंघ गोंदिया, तालुका महासंघ गोरेगाव, तालुका महासंघ सालेकसा, अंशकालीन स्त्री परिचर संघटना, तालुका महासंघ देवरी, तालुका महासंघ तिरोडा, तालुका महासंघ सडक-अर्जुनी, तालुका महासंघ आमगाव या संघटना सहभागी झाल्या होत्या.सदर संप जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस लिलाधर पाथोडे, संजय धार्मिक, पी.जी. शहारे, डॉ.यु.एल. यादव, विठ्ठल भरणे, शिक्षक समितीचे अध्यक्ष मनोज दीक्षित, संघाचे अध्यक्ष विरेंद्र कटरे, प्रा.ज्योतिक ढाले, आनंद पुंजे, लिलाधर जसूजा, लिलाधर तिबुडे, नरेंद्र रामटेककर, आर.आर मिश्रा, शिक्षक भारतीचे प्रकाश ब्राम्हणकर यांच्या नेतृत्वात करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित लाक्षणिक संपात उपस्थितांनी समस्या आपसात सांगून सदर समस्या सोडविण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांना देण्यात आले. जिल्ह्यातील आठही तालुक्यात संप पुकारण्यात आला होता. तालुकास्तरावर संप करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांनी या संपाला हजेरी लावली होती.नागरिकांची कामे खोळंबलीसालेकसा : कामगार कायद्याच्या बदलाविरुद्ध १० केंद्रिय कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. या संपाला सालेकसा तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सर्व शासकीय कार्यालयासह सर्व बँकोही बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये जनतेची कामे प्रभावित झाली. त्याचबरोबर बँका बंद राहिल्याने आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिवसभर दिसून आले.कायद्यातील बदलाबदल कामगाव संघटनांनी शासनाची चर्चा केली. परंतु त्याची कोणतीही निष्पती न निघाल्याने कामगार संघटनांनी हा संप पुकारला होता. तालुक्यात तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व सर्व बँकांसह इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे तालुक्यात संप यशस्वी ठरल्याचे दिसून आले. दुसरीकडे संपाचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांबरोबरच व्यापारी, कर्मचारी, शेतकरी वर्गाला बसल्याचे दिसून आले. सर्व बँकांचे शटर लावलेले होते. तहसील कार्यालय, पंचायत समितीचे दार उघडले होते. मात्र कर्मचारी झाडाखाली बसून राहिले. (प्रतिनिधी)