शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

उमेद कार्यकर्त्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

देवरी : उमेदच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण भागात महिला बचत गटाच्या माध्यमातून दिलेल्या अनेक योजनांमुळे अनेक ...

देवरी : उमेदच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण भागात महिला बचत गटाच्या माध्यमातून दिलेल्या अनेक योजनांमुळे अनेक लोकांचे संसार व कुटुंब सुरक्षित झाले आहे. अशाप्रकारे आपण लोकहिताकरिता योजना राबवीत असताना आपल्याला जे मानधन मिळते ते फार कमी आहे. या मानधनात वाढ झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. आपल्या या मागणीसंदर्भात मी स्वत: दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून उमेदच्या महिला कार्यकर्ता व कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आञिाग सहषराम कोरोटे यांनी केले.

तालुक्यातील उमेदच्या महिला कार्यकर्त्यांसाठी रविवारी (दि. ५) आयोजित आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात महिलांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रास्ताविक मांडून संचालन प्रमोद मोहबंशी यांनी केले. आभार ओमप्रकाश पातोडे यांनी मानले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता गायकवाड, मुकेश शहारे, तालुका अभियान व्यवस्थापक अतुल मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ता सीमा कोरोटे, उमेद कार्यकर्ता पंचशिला गांगुर्डे, आशा राऊत, प्रीती उजवणे, प्रदीपकुमार मोहबंशी, ओमप्रकाश पातोडे, गणेश वरखडे, निखिल लांजेवार, योगेश फुंडे, नंदिनी भांडारकर यांच्यासह देवरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद क्षेत्रातील उमेदच्या महिला कार्यकर्त्या व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.