शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

एपीआय रघुवंशीवर हल्ला करणाऱ्या दोघांची तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : फसवणुकीच्या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या भावाने हल्ला करून धमकी दिली होती. ...

गोंदिया : फसवणुकीच्या प्रकरणात हव्या असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या भावाने हल्ला करून धमकी दिली होती. या प्रकरणी दोन्ही भावांना रामनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज (दि.३) न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्या दोन आरोपींची भंडारा येथील तुरुंगात रवाना करण्यात आले आहे.

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दीनदयाल वॉर्ड येथे बुधवारी (दि.३०) रात्री १०.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. आरोपी राहुल डहाट (रा.दीनदयाल व़ॉर्ड) याच्यावर ३ मोबाइल अपहार प्रकरणात मार्च महिन्यात फसवणुकीचा गुन्हा रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल आहे. त्यामुळे राहुल हा पोलिसांना हवा होता. बुधवारी तो आपल्या घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी पथकासह त्याला अटक करण्यासाठी रात्री १०.३० वाजतादरम्यान त्याच्या घरी गेले. तेथे आरोपीचा भाऊ रजत डहाट त्याला वाचविण्यासाठी खोटे बोलू लागला व पोलीस पथकावर विटा फेकल्या. तसेच तलवार घेऊन पोलिसांना धमकी देऊ लागला. याबाबत माहिती मिळताच रामनगरचे निरीक्षक प्रमोद घोंगे घटनास्थळी गेले व पथकाने रजतला ताब्यात घेतले असता राहुल डहाट ही मिळून आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तलवार जप्त केली आहे. तर पळून जाण्यासाठी रजतने सपोनि रघुवंशी यांच्या हाताला चावा घेतला. प्रकरणी रामनगर पोलिसांनी भादंवि कलम ३५३, ३३२, २९४ भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आता त्या दोघांची भंडारा तुरंगात रवानगी केल्याची माहिती रामनगरचे ठाणेदार प्रमोद यांनी दिली आहे.