शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दोन नावे, दोन जन्मतारखा व तीन जन्मस्थळ

By admin | Updated: April 1, 2016 02:09 IST

तिरोडा तालुक्याच्या घाटकुरोडा जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील तत्कालीन कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापक व ...

पी.एच. लाडे फसवणूक प्रकरण : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दुर्लक्षगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या घाटकुरोडा जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील तत्कालीन कार्यरत उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सध्या नागरा (कटंगी) येथे कार्यरत पी.एच. लाडे यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्र घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तरी जिल्हा परिषदेने इतर प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यामुळे दोन नावे कसे व नेमके कोणते, जन्मतारिख कशी बदलली व नेमकी कोणती. तीन जन्मस्थळांपैकी खरे कोणते? याचा खुलासा आजही जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसून सदर शिक्षक बिनधास्तपणे कार्यरत आहे.जात बदलविण्याच्या गुन्ह्यात न्यायालय न्याय देईलच. परंतु जात बदल करून अभिलेखात खाडाखोड करणे, दोन नावे चालविणे, जन्म तारखेत बदल करणे, जन्म स्थळ वेगवेगळे दर्शविणे तसेच हे सर्व करण्यासाठी स्थानिक अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र लागतात, ते कसे मिळाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खऱ्या बाबी उजागर करण्यासाठी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याऐवजी जि.प. शिक्षण विभागाने सर्व दडवून ठेवले. देव्हाडा येथील मुख्याध्यापक प्रकाश वासुदेव साठवणे (ता. मोहाडी, जि. भंडारा) हे शालेय अभिलेखासह समितीसमोर हजर झाले. त्यात १ मे १९६१ ला शाळेत दाखल व जन्मतारिख २३ एप्रिल १९६१ नोंदविलेली आहे. दाखल खारिज रजिष्ट्ररवर नाव प्रेमदास हरिराम लाडे असून जन्मस्थळ नरसिंहटोला आहे. तर चंद्रपूर येथील ज्युनिअर कॉलेज आॅफ एज्युकेशनचे प्राचार्य यांना समितीसमोर बोलाविण्यात आले होते. त्यांनी समितीला पुरावे सादर केले. त्यानंतर कनिष्ठ लिपिक गणेश रामचंद्र मुखत्याल हे अभिलेख घेवून हजर झाले. त्यात जन्म तारिख २३ एप्रिल १९६५ असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक शाळेत जन्मस्थळ नरसिंहटोला (देव्हाडा), सेवा पुस्तिकेत साकोली येथील पंचशील वार्ड, तर जात प्रमाणपत्र नागपूर येथून बनविताना जन्मस्थळ नागपूर सांगण्यात आले. त्यामुळे प्रेमदास हरिराम लाडे हे नमके कोठे जन्माला आले, हे ठरविणे कठिण आहे. (प्रतिनिधी )