शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

गोंदिया : सरकारी रुग्णालयांमधून रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना न लावता तेच इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना स्थानिक ...

गोंदिया : सरकारी रुग्णालयांमधून रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना न लावता तेच इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि.५) रंगेहाथ पकडले आहे. गोंदिया शहरातील नामांकित असलेल्या बाहेकर हॉस्पिटलमधून इंजेक्शन रुग्णांना न लावता बाहेर येत असल्याची माहिती पुढे आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी गोंदिया शहर परिसरात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. कोविड-१९ आजारातील रुग्णांवर उपचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी अमोल नितेश चौधरी (२१), रा. विठ्ठल- रुक्मिणी चौक, छोटा गोंदिया या रुग्णवाहिका चालकाला दोन रेमडेसिविर इंजेक्शनसह अटक केली आहे. तो प्रत्येकी १५ हजार रुपयांत या इंजेक्शनची विक्री करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून त्याला अडकविले. बाहेकर हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या अमोल चौधरी याच्याकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्याने हे इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले. सफाई कामगार संजय तुरकर याला विचारणा केल्यावर त्याने बाहेकर हॉस्पिटलमधील एका नर्सकडून आणल्याचे सांगितले. ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, सहायक फौजदार लिलेंद्रसिंह बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, तुलसीदास लुटे, रेखलाल गौतम, इंद्रजित बिसेन, महेश मेहर, अजय राहांगडाले, विजय मानकर, संतोष केदार, महिला पोलीस शिपाई गेडाम यांनी केली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.च्या कलम ४२०, १८८, ३४, सहकलम २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बॉक्स

रुग्णांना इंजेक्शन न लावता

जात होते काळ्याबाजारात विक्रीला

बाहेकर हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका चालक अमोल नितेश चौधरी याने सफाई कामगार संजय रमेश तुरकर, रा. छोटा गोंदिया यांच्याकडून ते इंजेक्शन आणले. संजय तुरकरने ते इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलधील नर्सकडून आणल्याचे सांगितले. हे तिन्ही कर्मचारी बाहेकर हॉस्पिटलमधील आहेत. अमोलच्या पँटच्या खिशातून दोन मिथिल प्रेडनिसोलोन सोडियम इंजेक्शन मिळून आले. त्याने रेमडेसिविर व मिथिल प्रेडनिसोलोन इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलमधून आणल्याचे सांगितले.