शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोबाईल टॉवर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 00:54 IST

नगर परिषदेच्या कर वसुली विभागाने कर वसुलीसाठी ठोस पाऊल उचलत गोंदियातील दोन मोबाईल टॉवर सोमवारी (दि.२०) सील केले.

करवसुली विभागाचा दणका : ६.५० लाखांची थकबाकी, इतरांवरही होणार कारवाईगोंदिया : नगर परिषदेच्या कर वसुली विभागाने कर वसुलीसाठी ठोस पाऊल उचलत गोंदियातील दोन मोबाईल टॉवर सोमवारी (दि.२०) सील केले. या दोन टॉवर्सवर सन २००९ पासून सहा लाख ५१ हजार ५९८ रूपयांची थकबाकी आहे.३१ मार्चपर्यंत करवसुलीचे लक्ष्य निर्धारित करीत कर वसुलीची मोहीम आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यासाठी फक्त ११ दिवसांचा कालावधी उरला आहे. या कालावधीत जास्तीत जास्त कर वसुली व्हावी यासाठी कर वसुली विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यातच या विभागाकडून आता अंतिम टप्प्यात का असेना, रोखठोक भूमिका घेत थकबाकीदारांच्या मालमत्तेला सील करण्याची कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कर वसुलीदरम्यान मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी रामनगर परिसरातील दुकान सील केले होते. नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेंतर्गत सोमवारी (दि.२०) तीच परिस्थिती निर्माण झाली. वायरलेस पी.टी.इन्फो सर्विसेस यांच्या दोन टॉवरला कर वसुली विभागाच्या पथकाने सील केले. या कंपनीच्या गणेशनगर परिसरातील टॉवरवर सन २०१०-११ पासून तीन लाख तीन हजार ६९७ रूपयांची थकबाकी होती. तसेच सिव्हील लाईन्स परिसरातील टॉवरवर सन २००९-१० पासून तीन लाख ३७ हजार ९०१ रूपयांची थकबाकी होती. वारंवार मागणी करूनही कंपनीकडून थकबाकी भरली जात नसल्याने अखेर पथकाने सोमवारी (दि.२०) दोन्ही टॉवर्स सील केले. शासनाक डून नगर परिषदेला शंभर टक्के कर वसुलीबाबत पत्रक पाठविण्यात आले आहे. त्यानुसार नगर परिषद कर वसुलीच्या कामाला लागली आहे. मात्र मालमत्ता धारकांकडून कर भरण्यासाठी नेहमीच टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकारही घडतात. मात्र यंदा नगर परिषदेने कर भरण्यास नकार देणाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे थकबाकीदारांवर याचा वचक बसल्याचे दिसून येते. कर वसुलीच्या मोहिमेंतर्गत रामनगर मधील दुकान सील केल्यानंतर आता टॉवर्स सील करण्यात आल्याने त्याचा फायदा कर वसुलीसाठी मिळणार असल्याचेही दिसते. मात्र ही कारवाई आणखी अगोदर केली असती तर जास्त फायदा झाला असता अशी चर्चा सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)मोरे यांनी केली होती सुरूवात नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी दोन वर्षांपूर्वी कर वसुलीसाठी शहरात मालमत्ता सील करण्याची कारवाई केली होती. सिव्हील लाईन्स परिसरातील एक दुकान त्यांनी सील केले होते व त्यानंतर शहरातील एका शाळेलाही सील केले होते. त्याचा फायदाही नगर परिषदेला मिळाला होता व त्यावर्षी ५० टक्केपेक्षा जास्त कर वसुली झाली होती. आता यंदा मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी तीच मोहिम सुरू केली असून यंदाही याचा फायदा मिळतो काय, हे येत्या काही दिवसांत दिसणार आहे.