शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन जुगार अड्यांवर धाड, ३४ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: July 13, 2017 01:10 IST

गोंदिया शहरात मागील अनेक दिवसापासून सुरु असलेल्या लुडो या जुगारावर गोंदिया शहर पोलिसांनी धाडी घालून

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया शहरात मागील अनेक दिवसापासून सुरु असलेल्या लुडो या जुगारावर गोंदिया शहर पोलिसांनी धाडी घालून दोन ठिकाणात सापडलेल्या ३४ आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पहिली कारवाई मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गंज मार्केट येथे करण्यात आली. या प्रकरणात सहा हजार रुपये किंमतीचे लुडोच्या खेळाचा बोर्ड, २० बिल्ले, २१ हजार ५३० रुपये रोख अशा २७ हजार ८७० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस मुख्यालयातील संदीप वंजारी, सहायक पोलीस निरीक्षक नार्वेकर यांनी केली. या प्रकरणात गुरुलाल राजाराम तिडके (४०) रा. शास्त्री वार्ड, गोपाल नत्थु माहुरे (४०) रा. सिंधी कॉलोनी, अलताफ अख्तर सय्यद (३६) गोविंदपूर, विजू पंचम रगडे (३४) रा. गौशाला वार्ड, मेघनाथ वनवारी कुंभार (६२) रा. गौशाला वार्ड, पप्पू विक्रम नेताम (३२) गौशाला वार्ड, कुणाल किशोर राणे (२४) रा. गौशाला वार्ड, मोहन दादू नागडे (४०), रा. सावराटोली, रवि सुखराम खोब्रागडे (४७) रा.संजयनगर, गोपाल हरिभाऊ मेंढे (५०) श्रीनगर, निकेश श्यामराव कनोजिया (३६) इंगळे चौक, कचरु प्रेमप्रसाद कनोजिया (३६) कृष्णपुरा वार्ड, चैनलाल गोविंदराव लुगडे (४२) रा. कुडवा लाईन गोंदिया, रितेश राजू रगडे (३०) रा. सावराटोली व खेमराज दयाराम नंदनवार (३२) रा. बजाज वार्ड गोंदिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुसरा क्लब शास्त्री वार्डात शितल रंगारी क्रिडा क्लबच्या नावाने सुरु होता. या ठिकाणी ७ हजार २०० रुपये रोख, दोन लुडोचे टेबल व इतर साहित्य जप्त केले. सदर कारवाई मंगळवारी रात्री ८ वाजता करण्यात आली. या प्रकरणात १८ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात पंकज कृष्णावली चंद्रवंशी (४१) रा. शास्त्री वार्ड, राजू टिकाराम शहारे (४२) गोविंदपूर, अजय मोतीलाल कुथे (४१) गणेशनगर, मनिष वामनराव लाडे (३०) गांधी वार्ड, मनोज गणेश चंद्रवंशी (३३) कालीमंदिर जवळ गोंदिया, राजू मयाराम गुजर (३०) रा.शास्त्री वार्ड, प्रकाश जगतराम वैद्य (३९) गांधी वार्ड, सुरेश ललित कनोजिया (३५) शास्त्री वार्ड, हुसेनखा साहेबखा पठाण (६२) संजय नगर, बाबू उर्फ सलीम शब्बीर कच्छी (३०) शास्त्री वार्ड, देवेंद्र जयंत बंसोड (३२) रा. गांधी वार्ड, इरफान कदीर शेख (४२) सिव्हील लाईन, राहुल पन्नालाल फुकटे (२५) मनोहर चौक, धर्मेश उर्फ छोटू पन्नालाल पारधी (३०) शास्त्री वार्ड, संदीप उर्फ बबलू हेमराज वदरे (३१) शास्त्री वार्ड, नितीन हेमराज पराते (२७) रा. शास्त्री वार्ड, फारुख जाफर अली (३४) रा. नूरी चौक, हर्षलाल रामचंद रंगारी (४५) रा. शास्त्री वार्ड गोंदिया या आरोपीचा समावेश आहे. दोन्ही प्रकरणातील आरोपीवर मुंबई जुगार बंदी कायदा ४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.