शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केटीएसमध्ये दिव्यांग बालकांचे उपचार शिबिर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

गोंदिया : जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे केटीएस सामान्य रुग्णालयात बालकांसाठी शीघ्र हस्तक्षेप केंद्र या विभागातर्फे नुकतेच दिव्यांग बालकांसाठी मोफत आरोग्य ...

गोंदिया : जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे केटीएस सामान्य रुग्णालयात बालकांसाठी शीघ्र हस्तक्षेप केंद्र या विभागातर्फे नुकतेच दिव्यांग बालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्‌घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. प्रदीप गुजर, शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे समन्वयक पारस लोणारे, समुपदेशक अजितसिंग, संजय बिसेन उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. अमरीश मोहबे यांनी महाराष्ट्रात २५ जिल्ह्यांत हा शीघ्र हस्तक्षेप उपचार केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यात गोंदियाचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना जन्मत: असलेले आजार, बर्थ डिफेक्ट, विकासात्मक वाढीमुळे होणारे दृष्टिदोष, श्रवण दोष, वाचा दोष, वर्तनविषयक समस्या, अध्ययन क्षमता व बालपणातील आजार यासाठी विनामूल्य तपासण्या व उपचार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारीला गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत रेफर झालेल्या विशेष गरजा असलेल्या दिव्यांग बालकांचे विशिष्ट रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन बाह्यसंपर्क आरएमओ डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या पुढकाराने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पालकांना मार्गदर्शन करताना डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, पालकांनी बाळाच्या आरोग्याप्रती सजग असले पाहिजे. जन्मानंतर अल्पावधीत जर अपंगत्वाचे निदान झाले तर तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर उपचार करून त्यावर मात करता येते; परंतु अपंगत्व लपवून ठेवले तर समस्या वाढते व बालकांच्या आयुष्यभर परावलंबी जीवन पत्करावे लागते, असे सांगितले.

.....

७० बालकांची तपासणी

यावेळी शीघ्र प्रतिसाद क्लिनिकच्या डॉ. प्रदीप गुजर व त्यांच्या चमूने ७० बालकांची आरोग्य तपासणी व उपचार व समुपदेशक केले. अत्यावश्यक बालकांना संदर्भ सेवा दिली. हा स्पेशल कॅम्प यशस्वी करण्यासाठी पीयूष हारोडे, रोशन कुर्वे, पूजा बैस, अक्षय राठोड, प्रकृती मनोहर, रिना नेवारे, अमित शेंडे व लिल्हारे यांनी सहकार्य केले.