शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची दिली ५ लाखात सुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

गोंदिया : आपला व्यवसाय बुडेल या भीतीने शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांचा खून करण्यासाठी ५ लाखांची सुपारी ...

गोंदिया : आपला व्यवसाय बुडेल या भीतीने शहराच्या गणेशनगरातील अशोक बाबूलाल कौशिक (४५) यांचा खून करण्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली. त्या सुपारीचे २ लाख २० हजार रुपये आरोपीला मिळाले. सुपारी घेऊन अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता खून करण्यात आला. या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

गोंदिया शहरातील एनसीसी ट्रान्सपोर्टचे मालक अशोक बाबूलाल कौशिक (४५) हे आरोपी चिंटू शर्मा (३५) रा. सर्कस ग्राऊंडजवळ गोंदिया याच्या जिममध्ये जात होते. काही दिवसांपासून अशोक कौशिक नवीन टेक्नॉलॉजीची जिम चिंटू शर्मा यांच्या जिमच्या बाजूलाच टाकणार होते. यामुळे आपला व्यवसाय बुडेल या भीतीने चिंटू शर्मा याने पाच लाखात अशोक कौशिक यांची सुपारी दिली. आरोपी सतीश बनकर (३०) रा. छोटा गोंदिया याने ही सुपारी पाच लाखात घेतली. त्या पाच लाखांपैकी २ लाख २० हजार रुपये सतीशला आरोपी दीपक भुते (३२) रा. छोटा गोंदिया याने नेऊन दिले. एका मोटारसायकलवर जाऊन सतीश बनकर याने सकाळी ७ वाजता गोंदियाच्या सर्कस मैदानावर मॉर्निंग वाॅक करीत असताना अशोक कौशिक यांच्या डोक्यावर गोळी झाडून त्यांचा खून केला. या प्रकरणात आरोपी सतीश बनकर, जिम चालक चिंटू शर्मा व जिममधील असिस्टंट दीपक भुते या तिघांना गोंदिया शहर पोलिसांनी २१ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे, सागर पाटील, सहाय्यक फौजदार घनश्याम थेर, पोलीस नायक जागेश्वर उईके, सुबोध बिसेन, योगेश बिसेन,विकास वेदक, अनिल कोरे, छगन विठ्ठले, भेंडारकर यांनी केली आहे.