शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन महामंडळ दिव्यांगांवर मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:36 IST

सुरक्षीत प्रवासाची विश्वसनीय सेवा देत असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सुविधेसाठी विविध सोयी व सवलती उपलब्ध करवून देते. अशातच महामंडळ दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत असून महामंडळाने दिव्यांगांना आता शिवशाहीत प्रवासासाठी चक्क ७५ टक्के सूट दिली आहे.

ठळक मुद्देशिवशाहीत ७५ टक्के सूट : ७ मार्चपासून अंमलबजावणी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुरक्षीत प्रवासाची विश्वसनीय सेवा देत असलेले राज्य परिवहन महामंडळ प्रवासी सुविधेसाठी विविध सोयी व सवलती उपलब्ध करवून देते. अशातच महामंडळ दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत असून महामंडळाने दिव्यांगांना आता शिवशाहीत प्रवासासाठी चक्क ७५ टक्के सूट दिली आहे. ७ मार्चपासून या नव्या निर्णयाची अंमलबजवणी झाली असून या निर्णयामुळे दिव्यांगबांधवांची एकप्रकारे लॉटरीच लागली आहे.‘कशाला करता विषाची परीक्षा-एसटी बरी खाजगी पेक्षा’ ही म्हण एसटीच्या प्रवासाला घेऊन चांगलीच प्रचलीत आहे. या म्हणीनुसारच बहुतांश प्रवासी एसटीनेच प्रवास करण्यास प्राथमिकता देतात. यामुळेच दुर्गम अशा गावांतही परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ मोठ्या दिखामात शिरून आपली सेवा देत आहे. त्यातल्या त्यात प्रवाशांचा प्रवास अधीक सुखद करता यावा यासाठी महामंडळाने ‘शिवशाही’ आणली. अत्यंत आरामदायक असलेल्या या बसेस लांबवरच्या प्रवासासाठी अत्यंत सुविधाजनक आहेत. मात्र ‘शिवशाही’चे दर जास्त असल्याने साधारण प्रवासी ‘शिवशाही’चा प्रवास टाळत होता.प्रवाशांना प्रवासासाठी वेगवेगळया सुविधा देतानाच महामंडळ मात्र दिव्यांगांवर चांगलेच मेहरबान दिसून येत आहे. दिव्यांगांना प्रवासात सुविधा असतानाच आता मात्र त्यांना थेट ‘शिवशाही’त प्रवासासाठी ७५ टक्के सूट दिली आहे. म्हणजेच, दिव्यागांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत लागणाऱ्या दराच्या ७५ टक्के दर कमी केले जाणार आहे.एकंदर फक्त २५ टक्के तिकीट दर भरून दिव्यांग बांधव ‘शिवशाही’चा सुखकर प्रवास उपभोगू शकतील. महामंडळाचा हा नवा निर्णय ७ मार्चपासून लागू करण्यात आला आहे.शिवशाहीचा प्रवास झाला स्वस्तराज्य परिवहन महामंडळाकडून लालपरीच्या तुलनेत शिवशाहीचा प्रवास महागडा होता. यामुळे साधारण व्यक्ती शिवशाहीचा प्रवास करणे टालत होते. परिणामी शिवशाही तोट्यात होती. हेच कारण हेरून, महामंडळाकडून काहीच दिवसांपूर्वी शिवशाहीचे दर कमी करून सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार असे करण्यात आले. त्यात आता दिव्यांगांना लालपरीप्रमाणेच शिवशाहीतही ७५ टक्के सूट मिळाल्याने शिवशाही आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Shivshahiशिवशाही